Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

शोभन नावाच्या शुभ योगामध्ये होत आहे आजच्या दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 8 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील अत्यंत खास

रिलिजन डेस्क

Sep 10,2019 12:15:00 AM IST

मंगळवार 10 सप्टेंबर रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे शोभन नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. नोकरी करणाऱ्या लोकांचा परफॉर्मन्स चांगला राहील. हे लोक आपल्या कामाने वरिष्ठांचे मन जिंकून घेतील. इंटरनेट, जाहिरात, शेअर बाजार, कमोडिटी आणि खेळाशी संबंधित लोकांसाठी दिवस विशेष खास राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...मेष : शुभ रंग : तांबडा | अंक : ३ नोकरीच्या ठीकाणी तुमच्या अधिकरांत वाढ होईल.काही किचकट कामातही लक्ष घालावे लागेल. आज कौटुंबिक प्रश्नांकडे लक्ष द्यायला फुरसत मिळणार नाही.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ४ व्यवसायात क्षुल्लक अडचणी तुम्हाला बेचैन करतील. आलेल्या संधींकडे सकारात्मक दृष्टीने पाहणे गरजेचे आहे. अध्यात्म मार्गाकडे आज तुमचा ओढा असेल.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ९ फार दगदग न करता आज विश्रांती घेतलेलीच बरी.कोणत्याही कामात अती आक्रमकता आज योग्य ठरणार नाही. धाडसाची कामे आज अजिबात नकोत.

कर्क : शुभ रंग : निळा | अंक : ३ आज तुमच्यासाठी अनुकूल दिवस असून वेळेचे योग्य नियोजन केलेत तर अनेक कामे वेळेत पूर्ण करता येतील. वैवाहीक जिवनात सामंजस्य राहील.

सिंह : शुभ रंग : आकाशी| अंक : ७ नोकरदारांनी आज फक्त मिटल्या तोंडी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे. तरूणांनी व्यसने टाळावीत.आज फक्त स्वार्थ साधा. परमार्थाच्या वाटेस जाऊ नका.

कन्या : शुभ रंग : मोरपंखी| अंक : ८ काही रसिक मंडळी कौटुंबिक सहलींचे बेत आखतील. चैन करण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च करतील. आज प्रेमी युगुलांना वडीलधाऱ्यांचे अशिर्वाद मिळतील.

तूळ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६ वाहन व जमिन खरेदी विषयक कामांना गती येईल. गृहीणी घर स्वछतेचे फारच मनावर घेतील. आज प्रेमप्रकरणे म्हणजे असून अडचण नसून खोळंबा.

वृश्चिक : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ जवळपासचे प्रवास लाभदायक होतील. काही नवी नाती जुळून येतील. विद्यार्थी अभ्यासाची टाळाटाळ करतील. शेजारी डोकावतील पण आपलेपणानेच.

धनू : शुभ रंग : चंदेरी | अंक : ५ कष्टांच्या प्रमाणात मोबदलाही भरपूर राहील. घरी प्रिय पाहुण्यांचे आगमन संभवते. आवडत्या छंदातून अर्थप्राप्ती होईल. वैवाहीक संबंधात गोडवा राहील.

मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : १ कार्यक्षेत्रात कितीही चढाओढ असली तरीही दैव आज तुमच्याच बाजूने आहे. प्रामाणिक प्रयत्नांना यश मिळणारच. वाणीत मात्र आज गोडवा असणे गरजेचे.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : २ आज घराबाहेर वावरताना क्रोधावर लगाम अवश्यक राहील. आपली मते इतरांस पटतीलच असे नाही.कुठेही आर्थिक गुंतवणूक तज्ञांच्या सल्ल्यानेच करावी.

मीन : शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ कार्यक्षेत्रात तुमच्या मानसन्मानात वृध्दी होणार असून तुमच्या शब्दाला वजन राहील. विरोधकही तुमच्या यशाचा हेवा करतील. आज तुम्ही म्हणाल ती पूर्व.
X
COMMENT