Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - Feb 12, 2019, 12:00 AM IST

मंगळवारचे राशिफळ : आजच्या शुभ योगामध्ये ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये नशिबाची स

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  मंगळवार 12 फेब्रुवारी रोजी भरणी नक्षत्र असल्यामुळे शुक्ल नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. गुंतवणूक आणि इतर आर्थिक व्यवहारामध्ये नशिबाची साथ मिळेल. लव्ह लाईफमध्ये सर्वकाही ठीक राहील. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांनी आज सावध राहावे. दिवस सामान्य राहील.

  पुढील स्लाइड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  मेष - मनाला उल्हासित ठेवणारा व आशादायी दिवस. शुभच बोला कारण जे बोलाल तसेच होणार आहे. विचारांना मात्र योग्य कृतीची जोड गरजेची आहे. शुभ रंग : जांभळा, अंक-7.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  वृषभ - आज अती आक्रमकतेने नुकसान होईल. अधिकाराचा गैरवापर नको. अविचारीपणाने कुठलेही महत्वाचे निर्णय घेऊ नका. श्रध्दा व सबूरीच कामी येईल.  शुभ रंग : पांढरा, अंक-8.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  मिथुन - नोकरीच्या ठिकाणी कामात कसूर न होण्यासाठी दक्षता घ्यावी लागेल. कर्तव्यपूर्तीसाठी आज खर्चाची तयारी ठेवा. एकाचा विषय दुसऱ्याकडे नकाे. वाद टाळा. शुभ रंग : हिरवा, अंक-४.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  कर्क - आर्थिक गुंता सहज सुटेल. महत्वाचे निर्णय दिवसाच्या उत्तरार्धात घेतलेले बरे. प्रयत्नवादी असाल. सर्वांची मने जपण्याचा गृहीणींचा प्रयत्न असेल.  शुभ रंग : डाळींबी, अंक-9.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  सिंह - तुमची कसोटी पाहणाऱ्या काही घटना घडतील. उद्योग व्यवसायात उद्धिष्टे गाठण्यासाठी परिश्रम वाढवावे लागतील. आज सहनशक्ती कामी येईल. शुभ रंग : नारिंगी, अंक-५.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  कन्या - सहज काही मिळेल या भ्रमात राहू नका. मित्र चुकीचेच सल्ले देतील. नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्गाच्या अपेक्षा वाढतच जाणार आहेत. शुभ रंग: मोरपंखी, अंक- 6.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  तूळ - आज काही घरगुती समस्या चित्त विचलीत करतील. रिकाम्या गप्पा टाळा. उद्योग व्यवसायात स्पर्धा वाढणार आहे. तत्वांशी तडजोड करणे भाग पडेल. शुभ रंग : स्ट्रॉबेरी, अंक-6.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  वृश्चिक - यश जवळच आल्याची जाणीव होईल. वैवाहीक जिवनांत आज सुसंवाद हिताचा राहील. परिवारासाठी वेळ देणे गरजेचे. रागावर नियंत्रण असायला हवे. शुभ रंग : अबोली, अंक-3.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  धनू - उधारी उसनवारी आज बंद ठेवा. ज्येष्ठांनी प्रकृतीची पथ्ये पळावीत. आज अहंकारास लगाम घालणे गरजेचे आहे. डॉक्टरांच्या भेटीचा योग संभवतो.  शुभ रंग : पिवळा, अंक-2.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  मकर - उच्चशिक्षण घेणाऱ्यांची स्वप्ने साकार होतील. तुमच्या जिद्धी व मेहनती स्वभवास पूरक असाच दिवस अाहे. झटपट लाभाच्या प्रसंगास मात्र बळी पडू नका. शुभ रंग : भगवा, अंक-7.   

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  कुंभ - कुटुंबियांना अभिमानास्पद वाटणारे कार्य आज तुमच्याकडून होईल.प्रिय व्यक्तीकडून तुमच्या भावना जपल्या जातील. अध्यात्मिक क्षेत्रात प्रगती होईल. शुभ रंग : केशरी, अंक-2.

 • Tuesday 12 February 2018 Daily horoscope in Marathi

  मीन - कतृत्ववान व्यक्तिंचा सहवास लाभेल. एखाद्या मित्रास मदत करावी लागेल. उद्योगधंद्यातील अनुकूल घटनांनी मनाचे नैराश्य दूर होईल. उत्तम दिवस.  शुभ रंग : निळा, अंक-१.

Trending