Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

दिव्य मराठी | Update - Mar 12, 2019, 12:00 AM IST

मंगळवार राशीफळ : 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी ठीक नाही आजचा दिवस, अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुम

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    मंगळवार 12 मार्च रोजी कृत्तिका नक्षत्र असल्यामुळे वैधृती नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पाकी 7 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतात. या लोकांना वाद आणि व्यर्थ खरचला सामोरे जावे लागू शकते. ठरवलेली कामे होण्यास उशीर होऊ शकतो. बिझनेसमध्ये नुकसान होण्याची शक्यता आहे. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    मेष : आज तुमच्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस अाहे. व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. मित्रांनी केलेल्या खोट्या स्तुतीनेही तुम्ही भाराऊन जाल. मस्त दिवस. शुभ रंग : भगवा | अंक : १ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    वृषभ : आज वेळे अभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. भिडस्तपणास लगाम घाला. शुभ रंग : सोनेरी | अंक : ३ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    मिथुन : स्पर्धा तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील.जे आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ६ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    कर्क : आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कुणी पाठीवर हात ठेऊन लढ म्हणाले तर त्याला म्हणावे तुच जा. सुरक्षिततेस प्राधान्य द्या.  शुभ रंग : पिवळा | अंक : ५ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    सिंह : अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. महत्वाच्या वाटाघाटी, विवाह विषयी चर्चेसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. शुभ रंग : डाळिंबी | अंक : ३ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    कन्या : आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही. शुभ रंग : हिरवा | अंक : ४ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    तूळ : आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. शुभ रंग : पांढरा | अंक : २ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    वृश्चिक : एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. अधिकारांचा गैरवापर टाळून कर्तव्यास प्राधान्य द्या. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल. शुभ रंग : क्रिम | अंक : ८ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    धनू : वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना थकवा जाणवेल. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांशी नमते घ्यावे. शुभ रंग : पिस्ता| अंक : ९ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    मकर : आज हातात पैसा राहील. आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा. शुभ रंग : गुलाबी| अंक : ६ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    कुंभ : आज रिकामटेकड्या चर्चेतून वाद होण्याची शक्यता आहे. समोरच्या व्यक्तीस मूर्ख समजण्याची चूक करू नका. जिवनांत जोडीदाराच्या मताने घ्या. शुभ रंग : मरून | अंक : ७ 

  • Tuesday 12 March 2019 Daily horoscope in Marathi

    मीन : अनपेक्षित मोठे खर्च उद्भवल्याने आर्थिक ओढाताण संभवते. वडीलधाऱ्यांशी मतभेद होतील पण त्यांच्या वयाचा मान राखाल. शुभ रंग : निळा | अंक : २ 

Trending