Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क, | Update - Aug 13, 2019, 12:05 AM IST

शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, 12 पैकी या 8 राशीचे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये राहतील लकी

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  मंगळवार 13 ऑगस्ट रोजी उत्तराषाढा नक्षत्र असल्यामुळे प्रीती नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने असल्यामुळे 12 पैकी 8 राशीच्या लोकांना नशिबाची साथ मिळू शकते. या आठ राशीच्या लोकांना जुन्या अडचणींमधून मुक्ती मिळेल. हे लोक आर्थिक व्यवहार आणि गुंतवणुकीमध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त इतर राशींसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
  आज घराबाहेर वादविवादात सामंजस्याने घेणे गरजेचे आहे. भविष्यकाळाच्या दृष्टीने एखादी गुंतवणूक करण्याचा विचार कराल. आज रागावर ताबा हवा.

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ७
  तुमच्यासाठी सगळा दिवस अनुकूल आहे. तुमचे कार्यक्षेत्रातील महत्व वाढेल. कर्ज प्रस्ताव मंजूर होतील. विरोधकही तुमचे वर्चस्व मान्य करतील.  

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३
  नोकरीच्या ठीकाणी पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळवून देणारा  दिवस अाहे. वरीष्ठ  तुमच्यावर  खूष  असतील. बढतीच्या  मार्गातील अडथळे आता दूर  होतील. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : शुभ रंग : आकाशी | अंक : १
  आज मनांत काही नकारात्मक विचार येण्याची शक्यता आहे. घरातील थोरांचे विचार समजून  घ्यावे लागतील. तुम्हाला एकांत हवासा वाटेल. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : भगवा | अंक : ८ 
  आज तुमचे मनोबल कमीच असेल. मनाच्या द्विधा अवस्थेत महत्वाचे निर्णय टाळलेले बरे. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. आज धाडस टाळा.

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ६
  आज वैवाहीक जिवनांतील काही जुन्या स्मृती मनास आनंद दंतील. व्यवसायांत भागिदारांशी सामंजस्य राहील. सकारात्मकतेने नव्या जबाबदाऱ्या पार पाडाल.

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १
  नेहमीची कामे सुरळीत पार पडतील. प्रापर्टी विषयी रेंगाळलेली कामे पुन्हा मार्गी लागतील. पैशाची कमतरता भासणार नाही. प्रेमप्रकरणे मात्र गोत्यात आणतील. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : २           
  कुटुंबातील सदस्यांत सामंजस्य राहील. नवोदीत कलाकारांना प्रसिध्दी मिळेल. खेळाडू स्पर्धा गाजवतील. गृहीणी आज स्वत:साठी वेळ काढतील. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  धनू : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९
  पैशाची आवक मनाजोगती असेल. कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढेल. आज खरे बोलण्यापेक्षा गोड बोलूनच आपला कार्यभाग साधून घ्यावा लागणार आहे. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : डाळींबी | अंक : ७
  आज काहीशी आक्रमक वृत्ती राहील. तुमच्यात उच्च प्रतीचा आत्मविश्वास राहील. इतरांपेक्षा काही वेगळेच करून दाखवायची उमेद असेल. अती धावपळ टाळा.

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : केशरी | अंक : ५
  चुकीची माणसे संपर्कात येतील. काम कमी दगदग जास्त होईल. आज स्वावलंबनच महत्वाचे राहील. नव्याने झालेल्या ओळखीत पैशाचे व्यवहार नकोत. 

 • tuesday 13 august 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : निळा | अंक : ४ 
  आज तुम्ही कुठेही आपलीच मर्जी चालवायचा प्रयत्न कराल. अहंकारामुळे काही हितसंबंध दुरावण्याची शक्यता आहे. वाणीत मृदुता असणे अत्यंत गरजेचे अाहे.

Trending