आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

सौभाग्य योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी शुभ राहील आजचा दिवस

रिलिजन डेस्क

Jan 14,2020 12:25:00 AM IST

मंगळवार 14 जानेवारी रोजी मघा नक्षत्रामुळे सौभाग्य नावाचा शुभ योग योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना ग्रह-ताऱ्यांची साथ मिळेल. या राशीच्या लोकांच्या जुन्या अडचणी दूर होऊ शकतात. नवीन लोकांसोबत ओळख होण्याचे योग आहेत. नवीन गुंतवणूक आणि फायदेशीर सौदे होऊ शकतात. नोकरी करणा-या लोकांना अधिका-यांची मदत मिळू शकते. नियोजित आणि खास काम करायची असल्यास मंगळवार शुभ आहे. यासोबतच इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ७

हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ३

आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.

  • मिथुन : शुभ रंग : राखाडी | अंक : ९

आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.

  • कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : ३

पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.

  • सिंह : शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.

  • कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ६

आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.

  • तूळ: शुभ रंग : निळा | अंक : ७

कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.

  • वृश्चिक : शुभ रंग : जांभ | अंक : १

व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.

  • धनू : शुभ रंग : लाल| अंक : ५

आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३

हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.

  • कुंभ : शुभ रंग : लेमन | अंक : ४

वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.

  • मीन : शुभ रंग : मोतिया| अंक : २

नोकरदार मंडळी वरीष्ठांचे मूड सांभाळतील. अधिकारी वर्गास कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागणार आहे. ज्येष्ठांना आज डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.

X
COMMENT