Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - May 14, 2019, 12:15 AM IST

बुधवार राशिफळ : आज पूर्व फाल्गुनी नक्षत्र आणि ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते, बिझनेस बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होऊ शकतात...

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    मंगळवार 14 मे रोजी पूर्व फाल्गुनी नक्षत्र आणि ग्रह-ताऱ्यांच्या स्थितीमुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांचे उत्पन्न वाढू शकते. आजच्या दिवशी हर्षण नावाचा शुभ योग जुळून येत असल्यामुळे नोकरदार लोकांना वरिष्ठांची मदत मिळेल. बिझनेस करणाऱ्या लोकांचे नवीन सौदे होतील. लव्ह-लाईफ आणि आरोग्याच्या बाबतील दिवस चांगला राहील. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    मेष : कार्यक्षेत्रात तुमचा प्रगतीरथ वेगवान राहील. नोकरदारांना नोकरीत बदल करण्यासाठी चांगल्या संधी चालून येतील. कलाकार व खेळाडू प्रसिध्दीच्या झोतात येतील.  शुभ रंग : राखाडी | अंक : ५ 

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : सगळी महत्वाची कामे दुपारपूर्वीच करून मोकळे व्हा.आज स्वावलंबन महत्वाचे राहील. दुपारनंतर दिवस अनुकूल नाही. जवळच्या मित्रांमधे वितुष्ट संभवते. शुभ रंग : क्रिम | अंक : २

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : नोकरीच्या ठीकाणी जबाबदाऱ्या वाढल्या तरी बढतीच्या मार्गातील अडथळेही दूर झाल्याचे जाणवेल. तुमच्या कामातील निष्ठा व समर्पण वरीष्ठांना प्रभावित करेल. शुभ रंग : भगवा | अंक : ७

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : पैशाची उधळपट्टी थांबवणे गरजेचे आहे. आज काही अती आवश्यक खर्च हात जोडून उभे राहणार आहेेत. गैरसमजाने दूरावलेली नाती जवळ येतील. शुभ रंग : तांबडा | अंक : ७

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : अधुनिक राहणीमानाकडे कल राहील. स्वत:ची हौस मौज भागवण्यासाठी खर्च कराल. वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी कराल. शुभ रंग : नारिंगी | अंक : ६ 

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : आज कौटुंबिक कर्तव्ये पूर्ण करण्यासाठी वेळ काढावा लागेल. मुलांना दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. जमाखर्चाचा मेळ घालणे आज जरासे अवघड जाईल. शुभ रंग: आकाशी | अंक : ३    

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    मीन : आर्थिक स्थिती उत्तम असून मानसिक स्वास्थ्य चांगले असेल. सहपरिवार चैन व मनोरंजनास वेळ द्याल. आज तुमची तब्येत काहीशी नरमच राहील.  शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ९ 

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    मकर : व्यावसायिक चढउतारांचा सामना करावाच लागणार आहे. काही मनाविरूध्द घटना मनास बेचैन करतील.वैवाहीक जिवनांत संध्याकाळी क्षुल्लक मतभेद होतील. शुभ रंग : जांभळा | अंक : १

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : नोकरीच्या ठीकाणी अधिकारी वर्ग आपल्यावर खूष आहेच या भ्रमात राहू नका. सहकाऱ्यांशी जुळवून घेणे गरजेचे आहे. जोडीदाराशी दुपारनंतर एकमत राहील. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ५

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : विविध मार्गाने आलेला पैसा जाण्यासाठी विविध मार्ग तयार अाहेत. भावनेच्या भरात दिलेले शब्द पाळावे लागणार आहेत. नेते मंडळींची लोकप्रियता वाढेल. शुभ रंग : पिस्ता | अंक : ४

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : सरकार दरबारी रखडलेली काही कामे दुपारनंतर मार्गी लागतील. रिकामटेकडी चर्चा फक्त वादास निमंत्रण देईल. आज फक्त कृतीस प्राधान्य देणे गरजेचे आहे. शुभ रंग : हिरवा | अंक : ९ 

  • Tuesday 14 may 2019 daily horoscope in Marathi

    धनू : नोकरीत वरीष्ठ गोड बोलून राबवून घेतील. वैवाहीक जिवनांत जोडीदाराची मते विचारात घेणे गरजेचे आहे. भवना व कर्तव्य यांचा समन्वय साधणे कठीण जाईल.  शुभ रंग : पांढरा | अंक : ८

Trending