आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 15 ऑक्टोबर 2019 रोजी अश्विनी नक्षत्र असल्यामुळे वज्र नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाच्या प्रभावाने काही राशीच्या लोकांचे आज खर्च वाढू शकतात आणि नुकसान होऊ शकते. व्यर्थ खर्च आणि वादामध्ये अडकू शकता. 12 पैकी 6 राशीच्या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये अडचणींना सामोरे जावे लागू शकते. इतर सहा राशीच्या लोकासांठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : पांढरा | अंक : ४ 
अत्यंत आत्मविश्वासाने घराबाहेर पडाल. योग्य व्यक्ती आज तुमच्या संपर्कात आल्याने अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. आपली मते इतरांना पटवून देऊ शकाल.

वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
अनावश्यक खर्चावर लगाम ठेवलात तरच अाज जमाखर्चाचा तराजू समतोल राहील. परदेशस्थ नातलग मंडळींशी संपर्क होईल. घराबाहेर वादविवाद टाळा.       

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १
आज तुमचा उंची राहणीमानाकडे कल राहील. आपल्या प्रियजनांसाठी मित्रमंडळींसाठी सढळ हस्ते खर्च कराल. भावनेच्या भरात दिलेली वचने पाळावी लागतील.  


कर्क :  शुभ रंग : नारिंगी | अंक
: ९
अथक प्रयत्नांच्या जोरावर आज तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरु राहील. अधिकारांचा गैरवापर टाळून आज कर्तव्यास प्राधान्य देणे गरजेचे आहे.  

सिंह : शुभ रंग : भगवा| अंक : ७
आज वेळेअभावी कौटुंबिक गरजांकडे तुमचे दुर्लक्ष होण्याची शक्यता आहे. वडीलधाऱ्यांच्या शब्दास मान द्यावा लागेल. व्यवसायात भिडस्तपणास लगाम घाला.

कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८
आज तुम्ही आपल्या मर्यादा ओळखून वागणेच हिताचे राहील. कोणत्याही प्रकारचे आर्थिक धाडस नकोच.  आज स्वत:च्या सुरक्षिततेसही प्राधान्य देणे गरजेचे.

तूळ : शुभ रंग : अबोली| अंक : १ 
कार्यक्षेत्रात स्पर्धा अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. आज चर्चेपेक्षा झटपट निर्णय घेणे हिताचे राहील. ज्यात आपल्याला कळत नाही त्यात उगीच डोकं घालू नका.                                                                       

वृश्चिक : शुभ रंग : चंदेरी| अंक : ३ 
आज तब्येतीच्या किरकोळ तक्रारीही दुर्लक्षित करू नका. विवाह जुळवण्याविषयी बोलणी उद्यावर ढकला. आज कोणतेही निर्णय उताविळपणे घेणे योग्य ठरणार नाही.                                                                                  


धनू :  शुभ रंग : जांभळा| अंक
: २
आज बरेच दिवसानी तुम्हाला अपेक्षित असलेल्या प्रिय व्यक्तीचा अचानक फोन येण्याची शक्यता आहे. कवींना प्रेमगीते सुचतील. गृहीणी पार्लरसाठी वेळ काढतील.                       

मकर : शुभ रंग : पिवळा| अंक : ५
एखादा नवीन विषय शिकण्याची संधी मिळेल. आज मुलांच्या शिस्तीकडे लक्ष पुरवावेे लागेल. वाढत्या जबाबदाऱ्या पूर्ण करताना  थकवा जाणवेल.                                                                                     

कुंभ : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६
काही कारणाने आज कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागेल. नोकरीत वरीष्ठांशी नमते घ्यावेेे. घराबाहेर वाद होण्याची शक्यता.  शेजारी  आपुलकीने वागतील.   

मीन : शुभ रंग : मोतिया | अंक : ४                                                                       
हातात पैसा राहील. आज आवडत्या क्षेत्रात नेतृत्व करण्याची संधी मिळेल. चैनी व विलासी वृत्तीस खतपाणी घालाल. शब्द हे शस्त्र आहे याचे भान ठेवा.