Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क, | Update - Jul 16, 2019, 12:25 AM IST

आज गुरुपौर्णिमा आणि चंद्रग्रहण, 149 वर्षांनंतर जुळून येत आहे हा योग, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा दिवस

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  मंगळवार 16 जुलै रोजी पौर्णिमा तिथी आहे. यासोबतच आषाढ मासातील पौर्णिमेला गुरुपौर्णिमा साजरी केली जाते. याव्यतिरिक्त आज या वर्षातील शेवटचे चंद्रग्रहण आहे. पूर्वाषाढा नक्षत्रामध्ये दिवसाची सुरुवात होत असून वैधृती नावाचा योग जुळून येत आहे. हा अशुभ योग 12 पैकी 6 राशीच्या लोकांसाठी अडचणी निर्माण करू शकतो. वाद आणि व्यर्थ खर्चाला सामोरे जावे लागू शकते. महत्त्वाच्या कामामध्ये अडथळे निर्माण होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर 6 राशीच्या लोकांसाठी दिवस ठीक राहील.

  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  मेष : शुभ रंग : भगवा | अंक : ४
  घरातील थोरांचे हट्ट पुरवावे लागतील. उद्योग व्यसायात काही तणावांना सामोरे जावे लागेल. ज्येष्ठ मंडळींनी घरात फार लक्ष न घालता नातवंडांत रमणेच हिताचे.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ : शुभ रंग : केशरी | अंक : २
  आज फार दुनियादारी नको, फक्त आपल्या स्वाथार्वर लक्ष केंद्रीत करा. मेहनतीची कामे करणाऱ्यांनी आपल्या सुरक्षेस प्राधान्य द्यावे. वाहन चालवताना जपून बरं का. 

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : शुभ रंग : क्रिम | अंक : ५                                                                            
  काही मनाजोगत्या घटनांनी वैवाहीक जिवनांत बहार येईल. कार्यक्षेत्रात नव्या योजना राबवता येतील. गृहीणी चार चौघीत झालेल्या कौतुकाने भारावून जातील. 

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : शुभ रंग : पिस्ता | अंक : १                                                             
  नोकरदारांनी बिनचूक काम करण्यास प्राधान्य द्यावे.कुणाकडेही सल्ले न मागता फक्त आपल्या मनाचा कौल घ्या. गृहीणींनी झाकली मूठ झाकूनच ठेवावी.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : शुभ रंग : लाल | अंक : ३                                                             
  आवडते छंद जोपासण्यासाठी खास वेळ काढाल.पैशाची कमतरता जाणवणार नाही. नवोदीत कलाकारांच्या प्रयत्नांस यश येईल. संधी मिळतील. 

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : शुभ रंग : हिरवा | अंक : ९                                                                          
  पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : २
  कौटुंबिक वाढत्या गरजा भागवताना नाकी नऊ येतील. नोकरीच्या ठीकाणी बदलीचे समाचार येतील. महत्वाचे दस्तऐवज सांभाळून ठेवा.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ८
  व्यवसायात उत्तम यश मिळून स्वत:ची वेगळी ओळख निर्माण होईल. तुम्ही गरजूंस मदत करायला तत्पर असाल. मृदु वाणीने सर्वांना आपलेसे कराल.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  धनू : शुभ रंग : जांभळा | अंक : ५                                                                             आज हातचे सोडून पळत्या मागे धावणे हिताचे ठरणार नाही. क्रोधावर ताबा गरजेचा. उतावीळपणे घेतलेले निर्णय आज चुकण्याची शक्यता आहे.

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : शुभ रंग : पांढरा | अंक : ८                                                                           
  अाज तुमचा उंची राहणीमाकडे कल राहील. काही प्रतिष्ठीतांचा सहवास लाभल्याने तुमचा आत्मविश्वास वाढेल. आज मित्रांमधे तुमच्या शब्दाला वजन राहील. 

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  मकर : शुभ रंग : निळा | अंक : १                                                                          
  आज दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल.  प्रवासाचे याेग अटळ आहेत. प्रवासात नव्या ओळखी होतील. 

 • tuesday 16 july 2019 daily horoscope in Marathi

  मीन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७
  केवळ स्वप्नरंजनापेक्षा आज तुम्ही कृतीस अधिक प्राधान्य द्याल. नोकरीच्या ठीकाणी सहकाऱ्यांवर अंकूश राहील. नेते मंडळींचा जनपानसांवर प्रभाव राहील.

Trending