राशिफळ / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

आज अंगारक संकष्ट चतुर्थी, शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील आजचा मंगळवार

रिलिजन डेस्क

Sep 17,2019 12:05:00 AM IST

मंगळवार 17 सप्टेंबर रोजी रोजी अश्विनी नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे ध्रुव नावाचा शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज अंगारक संकष्ट चतुर्थीचा शुभ योगही जुळून येत आहे. यामुळे आजच्या दिवसाचे महत्त्व अधिकच वाढले आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने भौतिक सुख आणि धनलाभ होईल. आज काही लोकांना आपल्या कार्यक्षेत्रामध्येच धनलाभ होईल. काही लोकांचा अडकेलेला पैसा परत मिळू शकतो. हा शुभ योग नवीन योजना बनवण्यसाठी सहायक ठरेल.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रूसवे फुगवे असतील.वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ३ कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हीताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. दिवस लाभाचा असल्याने अाज व्यवसायात एखादे मर्यादीत धाडस करायला हरकत नाही. मित्र तुमच्या शब्दाला मान देतील.कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : १ नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी अश्वासने देऊन राबवून घेतील. कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७ व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकूश ठेवावा लागेल. मानसिक शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही.कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ९ भागिदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.तूळ : शुभ रंग : लाल | अंक : २ आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस.वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ४ तुमचा उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.आनंदी दिवसमकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६ अध्यात्मिक मार्गात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ५ अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतीहुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ राशीच्या धनस्थानातून चंद्र भ्रमण सुरु असताना पैसा कमी पडणार नाही. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. आज काैटुंबिक जिवनांत सलोखा व मधुरता राहील.

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ आवक पुरेशी असल्याने तुमचे मनोबल उत्तम राहील. व्यावसायिक स्पर्धेचा सामना करण्यासाठी सज्ज असाल. वैवाहीक जिवनांत लाडीक रूसवे फुगवे असतील.

वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : ३ कुणाकडून सहकार्याची अपेक्षा करू नका. स्वावलंबन हीताचे राहील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडतील. कंजूषपणा सोडून द्या. आज खर्चावर लगाम शक्य नाही.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. दिवस लाभाचा असल्याने अाज व्यवसायात एखादे मर्यादीत धाडस करायला हरकत नाही. मित्र तुमच्या शब्दाला मान देतील.

कर्क : शुभ रंग : क्रिम | अंक : १ नोकरीत वरीष्ठ मंडळी खोटी अश्वासने देऊन राबवून घेतील. कुटुंबियांना पुरेसा वेळ देता येणार नाही. मुलांच्या तब्येतीकडे लक्ष द्यावे लागणार आहे. थकवा जाणवेल.

सिंह : शुभ रंग : जांभळा| अंक : ७ व्यवसायात आर्थिक अडचणींना धैर्याने तोंड द्याल.चैनी व विलासी वृत्तीवर अंकूश ठेवावा लागेल. मानसिक शांती व समाधान मिळवण्यासाठी उपासनेशिवाय पर्याय नाही.

कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ९ भागिदारीच्या व्यवसायात मतभेद संभवतात. फक्त आपलं बघा. कुणी मागितल्या शिवाय सल्ले देऊ नका. मैत्रीत व नात्यांत आर्थिक व्यवहार नकोत.

तूळ : शुभ रंग : लाल | अंक : २ आज एखादी अविस्मरणीय घटना घडेल. तुमच्या कार्यक्षेत्रात उत्साहवर्धक वातावरण राहील. एखाद्या शुभकार्यात जोडीने उपस्थित रहाल. छान दिवस.

वृश्चिक : शुभ रंग : मोतिया | अंक : ८ कौटुंबिक सौख्य लाभेल. एखादी आनंदाची बातमी कानी येईल. व्यापारात मोठे धाडस टाळा. खाण्यावर नियंत्रण ठेवणे गरजेचे. अपचनाचे त्रास संभवतात.

धनू : शुभ रंग : केशरी | अंक : ४ तुमचा उत्साह व उमेद वाढवणाऱ्या घटना घडतील.शेअर्स व्यवहारात अपेक्षित नफा होईल. सौदर्य प्रसाधनांचे व्यवसाय तेजीत चालतील.आनंदी दिवस

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ६ अध्यात्मिक मार्गात प्रगती होईल. विद्यार्थ्यांना अभ्यासात एकाग्रता साधता येईल. कलाक्षेत्रातील मंडळींना प्रयत्न वाढवावे लागतील. प्रेमाच्या भानगडीत पडूच नका.

कुंभ : शुभ रंग : मरून| अंक : ५ अनपेक्षित प्रवासाचे योग आहेत. काही अतीहुषार मंडळींचा सहवास लाभणार आहे. न मागताही कुणी सल्ले देतील. हो म्हणून सोडून द्या. आज वाद टाळा.

मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ राशीच्या धनस्थानातून चंद्र भ्रमण सुरु असताना पैसा कमी पडणार नाही. घरात सुखसुविधांसाठी खर्च कराल. आज काैटुंबिक जिवनांत सलोखा व मधुरता राहील.
X
COMMENT