आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 22 ऑक्टोबर रोजी अत्यंत शुभ योग जुळून येत आहेत. आज पुष्य नक्षत्रामुळे साध्य नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने धनलाभ आणि फायदा होऊ शकतो. ठरवलेली कामे वेळेवर पूर्ण होतील आणि नवीन कामांची प्लॅनिंग होईल. कामात व्यस्त असलेले लोक स्वतःसाठी आणि कुटुंबासाठी वेळ काढू शकतील. नोकरी करणाऱ्या लोकांची नवीन लोकांशी ओळख होईल. बिझनेस करणारे लोक एक्स्ट्रॉ इन्कमसाठी प्लॅनिंग करू शकतात. 12 पैकी 8 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस खास राहील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...
 

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
मनाजोगत्या घटना तुमचे मनोबल वाढवतील. एखाद्या कौटुंबिक सोहळयात सहभागी व्हाल. दुसऱ्यास मदत करताना आधी स्वत:ची शिल्लक तपासणे गरजेचे.

वृषभ: शुभ रंग : क्रिम | अंक : ४
अथक परिश्रमांच्या जोरावर तुमची ध्येयाकडे वाटचाल सुरू राहील. भावंडात झालेले गैरसमज दूर होतील. आज महत्वाच्या कामासाठी भटकंती होईल.      

मिथुन : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३
अधुनिक रहाणिमानाची आवड जोपासता येईल. एखाद्या सामाजिक कार्यात पुढाकार घ्याल. गृहीणींना एखाद्या समारंभात मनासारखा मानपान मिळेल. छान दिवस.   

कर्क :  शुभ रंग : पांढरा | अंक :
आज तुम्हाला संयमाची गरज असून अती उत्साहाच्या  घेतलेले निर्णय चुकण्याची शक्यता आहे. कायद्याची चौकट मोडणे महागात पडू शकते. मुलांनी आज्ञेत रहावे.  

सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ७
आज काही फसव्या संधी चालून येतील. हातचे सोडून पळत्याच्या मागे धावण्यापूर्वी विचार करा. गृहीणींनी झाकली मूठ झाकलीच ठेवलेली बरी. 

कन्या : शुभ रंग : हिरवा| अंक : ९
एखाद्या नवीन व्यवसायाची सुरवात करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. आज राशीच्या लाभातून चंद्रभ्रमण सुरू अाहे. अपूरी स्वप्ने साकार होतील.  

तूळ : शुभ रंग : पांढरा| अंक : २
उद्योग व्यवसायात प्रगतीरथ वेेगवान राहील. तुम्ही आत्मविश्वासाने घेतलेले निर्णय फायदेशीर ठरतील.आज तुमचा उच्च राहणीमानाकडे कल राहील. 

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५ 
कर्यक्षेत्रात काही अंतर्गत राजकारणाचा सामना करावा लागेल. वरीष्ठांची मर्जी सांभाळावीच लागणार आहे.विरोधकांशी गाेड बोलूनच वेळ मारून न्यावी लागेल.   


धनू :  शुभ रंग : अबोली| अंक
: ८
आज काही क्षुल्लक कारणाने घरातील थोरांशी मतभेद संभवतात. कुठलीही गोष्ट सहज साध्य नसून अथक परिश्रम गरजेचे आहेत. नवीन ओळखीत व्यवहार नकोत.   

मकर : शुभ रंग : आकाशी| अंक : १
आज तुम्ही कारण नसताना दुसऱ्यांच्या भानगडीत डोकावणार आहात. एखादा विवाह जुळवण्यासाठी यशस्वी मध्यस्ती कराल. पत्नीस दिलेली वचने पाळाल.

कुंभ : शुभ रंग : पिस्ता | अंक : ५ 
उद्दीष्ट साध्य करण्यासाठी काबाड कष्टांशिवाय दुसरा पर्याय नाही. बेरोजगारांची वणवण संपेल. मित्रांमधे आज काही वैचारीक मतभेद होण्याची शक्यता आहे.

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : ३
उच्चशिक्षितांच्या अपेक्षा वाढतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमर मिळेल. रुग्णांच्या प्रकृतीत लक्षणीय फरक दिसेल.  नवविवाहीतांना बाळाच्या आगमनाची चाहूल लागेल.

बातम्या आणखी आहेत...