Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 23, 2019, 08:07 AM IST

मंगळवारचे राशिफळ : आजचे ग्रह-तारे 6 राशींसाठी ठीक नाहीत,परीघ नावाचा अशुभ योग राहील दिवसभर, संध्याकाळी 5 वाजता चंद्र बदलण

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi
  मंगळवार 23 एप्रिलचे ग्रह-तारे मेषपासून मीनपर्यंत 6 राशींसाठी अडचणीचे ठरू शकतात. दिवसभर परीघ नावाचा अशुभ योग राहील. यामुळे काही राशीच्या लोकांना नुकसान सहन करावे लागू शकते. ज्येष्ठा नक्षत्रामध्ये सूर्योदय होईल. चंद्र मंगळाची राशी वृश्चिकमध्ये राहील. येथे जाणून घ्या, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी कसा राहील...

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  मेष : ध्येयप्राप्तीसाठी अविश्रांत काम करण्याची तुमची तयारी असेल. तरीह आज कामाचे दडपण जाणवेल. तब्येतीची हेळसांड नको. शुभ रंग: जांभळा|अंक:३ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  वृषभ: व्यवसायात अनपेक्षित पैसा येईल. रखडलेल्या योजना मार्गी लागतील. वडीलधाऱ्यांना कौतंकास्पद वाटणारी कामगिरी तुमच्याकडून होईल. संततीकडून सुवार्ता. शुभरंग:तांबडा|अंक:८ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  मिथुन : आज गृहसौख्याचा दिवस. नोकरदारांना कामावर दांडी मारायचा मूड राहील. आज सहकुटुंब सहलीस, करमणूकीस प्राधान्य द्याल. मुलांचे हट्ट पुरवाल. शुभ रंग : क्रिम| अंक : १ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  कर्क : आज जास्त वेळ घराबाहेरच जाईल. एखाद्या महत्वाच्या कामासाठी बरीच धावपळ होणार आहे.कार्यालयिन कामासाठी प्रवास घडतील. शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ३ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  सिंह : आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल. शुभ रंग : पांढरा | अंक : २ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  कन्या : व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. शुभ रंग : चंदेरी | अंक : १ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  तूळ : बेरोजगारांना घरापासून लांब रोजगाराच्या संधी येतील. उच्चशिक्षित असाल तर विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च मात्र आवाक्याबाहेर जाणार आहे.  शुभ रंग : गुलाबी | अंक : ४ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  वृश्चिक : तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. आपला मोठेपणा जपण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. शुभ रंग : केशरी | अंक : ५ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  धनू : व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या. शुभ रंग : राखाडी | अंक : ६ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  मकर : नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे. शुभ रंग : आकाशी | अंक : ९ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  कुंभ : थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनसला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.  शुभ रंग : डाळिंबी | अंक : ८ 

 • Tuesday 23 april 2019 daily horoscope in Marathi

  मीन : ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, आज पत्नीचा सल्ला डावलू नका. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ७

Trending