आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

मंगळवार, 24 डिसेंबर रोजी अनुराधा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे शूल नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या अशुभ योगाच्या प्रभावामुळे 12 पैकी 6 राशींसाठी दिवस संकटाचा राहू शकतो. शूल योगात केलेले कोणतेही कार्य पूर्णत्वास जात नाही. यामुळे शास्त्रानुसार या दिवशी महत्त्वाची कार्ये टाळणेच चांगले. इतर 6 राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : मरून | अंक : २

काही मनस्ताप देणाऱ्या घटना घडतील. आज फक्त आपल्याच प्रेमात रहा. कुणालाही सल्ले द्यायच्या भानगडीत पडू नका. कामगारांनी सुरक्षेस प्राधान्य द्यावे.

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : ५

काेणत्याही क्षेत्रात असलात तरी स्पर्धा अटळ आहे. खेळाडूंना आज अटीतटीची झुंज द्यावी लागेल. वैवाहीक जिवनात जोडीदाराच्या चूका काढायची चूक करू नका. 

  • मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : ९

बेरोजगारांच्या भटकंतीस यश येईल. कामगारांच्या रास्त मागण्या मान्य होतील. ज्येष्ठ मंडळींनी फक्त आपल्या तब्येतीस जपावे, जास्त दगदग टाळावी.

  • कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ४

विविध मार्गाने आलेला पैसा विविध मार्गाने जाईल.स्वत:चा मोठेपणा दाखवण्यासाठी खर्च कराल.आज सहकुटुंब मनोरंजनाच्या कार्यक्रमाचा आस्वाद घ्याल.

  • सिंह : शुभ रंग : लाल| अंक : ७

आज आवक जावक सेम सेम राहील. भावंडात प्रेम राहील. गृहीणी स्वत:च्या आवडीस प्राधान्य देतील.मुले पालकांच्या आज्ञेत राहतील. आशादायी दिवस.

  • कन्या : शुभ रंग : जांभळा | अंक : ६

दैनंदीन कामांचा कंटाळा येईल. इतरांना न जमणारे काहीतरी वेगळेच करण्याकडे तुमचा कल राहील. विद्यार्थ्यांना नवीन विषयात गाेडी निर्माण होईल. 

  • तूळ: शुभ रंग : गुलाबी | अंक : ८

व्यवसायात पूर्वीच्या कष्टांचे फळ मिळेल. विरोधकांचा विरोध मावळेल. कार्यक्षेत्रात योग्य हितसंबंध निर्माण होतील. पुरेशी बचत करता येईल.

  • वृश्चिक : शुभ रंग : सोनेरी | अंक : २

आज काही मनासारख्या घटना घडल्याने तुमचा कार्यउत्साह वाढेल. महत्वाच्या चर्चेत अग्रेसर  रहाल. कुणी केलेल्या खोटया स्तुतीनेही भाराऊन जाल. 

  • धनू : शुभ रंग : मोरपंखी | अंक : १

आज भविष्यासाठी आर्थिक नियोजनास प्राधान्य द्याल. आज काही दूरच्या नातलगांशी स्नेहपूर्ण संबंध निर्माण होतील. दूरच्या प्रवासात मौल्यवान जपा. 

  • मकर : शुभ रंग : पांढरा | अंक : ४

योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन याच्या जोरावर यशाकडेच तुमची वाटचाल चालूच राहील. प्रगतीचे मार्ग प्रशस्त होतील. अकस्मिक धनलाभाची शक्यता. 

  • कुंभ : शुभ रंग : लेमन | अंक : ३

आज तुम्ही मित्रमंडळींच्या फार नादी लागू नका. आत्मविश्वास व स्वावलंबन गरजेचे आहे. आज ऐकावे जनाचे व करावे मनाचे हेच धोरण हिताचे राहील. 

  • मीन : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५

नोकरीच्या ठीकाणी वरीष्ठांनी दिलेल्या शाब्बासकीस बळी जाऊ नका. हाताखालच्या लोकांशीही सलोख्याचे संबंध गरजेचे आहेत. उपासनेत खंड पडू देऊ नका.

बातम्या आणखी आहेत...