आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
मंगळवार, 26 नोव्हेंबर रोजी दिवसाची सुरुवात विशाखा नक्षत्रामध्ये होत आहे. दर्श अमावस्या, ग्रह आणि नक्षत्रांच्या योगाने आज 12 पैकी 5 राशींसाठी चांगले योग जुळून येत आहेत. उर्वरीत राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र स्वरुपाचा राहील.
जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार
मेष : शुभ रंग : मोतिया | अंक : ५ हौशी मंडळींना आज जिवाची मुंबई करण्यास पुरेसा पैसा उपलब्ध होईल. तुमच्या कामातील उत्साह इतरांना प्रेरणा देईल. ज्येष्ठांना उत्तम प्रकृती स्वास्थ लाभेल.
वृषभ: शुभ रंग : तांबडा | अंक : १ आज तुमचे मनोबल उत्तम असेल. आवक पुरेशी असली तरी बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील. गृहीणी जबाबदाऱ्या हसतमुखाने पार पाडतील.
मिथुन : शुभ रंग : पांढरा | अंक : ३ आज घराबाहेर रागिट स्वभाव काबूत ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. अती स्पष्ट बोलण्याने इतरांच्या भावना दुखावण्याची शक्यता आहे. काही गुपिते उघड होतील.
कर्क : शुभ रंग : हिरवा | अंक : ७ पैशाची कमतरता जाणवणार नाही. घराबाहेर तुमच्या वक्तृत्वाचा व कतृत्वाचाही प्रभाव पडेल. भावंडांमधे मात्र क्षुल्लक कारणाने कटुता येण्याची शक्यता आहे.
सिंह : शुभ रंग : राखाडी| अंक : ९ अथक परिश्रमांच्या सहाय्याने प्रगतीची चक्रे गतीमान ठेवता येतील. योग्य माणसे संपर्कात येतील. काही महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होणार आहे.
कन्या : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ८ आपले काम सोडून इतरांच्या भानगडीत डोकवाल. आज गरजूंना मदत करण्यासाठी पदरमोड कराल. दानधर्म करताना स्वत:ची शिल्लक बघायला हवी.
तूळ : शुभ रंग : लाल | अंक : १ कार्यक्षेत्रात नवे हितसंबंध प्रस्थापित होतील. मोठया लोकांमधील उठबस फायदेशीर राहील. उपवरांंना योग्य स्थळांचे प्रस्ताव येतील. इच्छापूर्तीचा दिवस.
वृश्चिक : शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ व्यवसायात उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अविश्रांत कष्ट करायची तयारी ठेवावी लागेल. उत्पादनांचा दर्जा वाढवावा लागेल. प्रामाणिक प्रयत्नांस यश निश्चित.
धनू : शुभ रंग : आकाशी | अंक : ४ आज तुम्ही फक्त स्वत:चा विचार करा. न पेलणाऱ्या जबाबदाऱ्या टाळणेच हिताचे राहील. वादविवादात फक्त ऐकण्याचे काम करा. मोफत सल्लेवाटप नको.
मकर : शुभ रंग : मोरपिशी | अंक : ६ हौसमौज करताना मर्यादांचे उल्लंघन करू नका. चूकीच्या वर्तनाने प्रतिष्ठेची हानी होऊ शकेल. आज वैवाहीक जिवनांत जोडीदाराकडून फार अपेक्षा नकोत.
कुंभ : शुभ रंग : पिस्ता| अंक : ३ वैवाहीक जिवनांत असलेले किरकोळ मतभेद आज सामंजस्याने मिटू शकणार आहेत. व्यवसायाच्या ठीकाणी भागिदारांशी सलोखा राहील. आनंदी दिवस.
मीन : शुभ रंग : क्रिम| अंक : ५ नोकरदारांना आज वरीष्ठांचे मूड सांभाळावे लागतील. अधिकाऱ्यांना कामगारांच्या प्रश्नांत लक्ष घालावे लागेल. ज्येष्ठांना डॉक्टरांच्या भेटीचे योग अटळ आहेत.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.