आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
 • कॉपी लिंक

मंगळवार 3 डिसेंबर रोजी धनिष्ठानक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे मंगळवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती पाच राशीवर शुभ प्रभाव टाकेल. येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

 • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : २

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असल्याने तुम्ही कोणतेही काम आत्मविश्वासाने कराल. कार्यक्षेत्रात पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येतील.छान दिवस. 

 • वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : १

आज भावनेपेक्षा कर्तव्यासच प्राधान्य द्याल. व्यवसायात उध्दीष्टे गाठण्यासाठी कामाचे तास वाढवावेच लागणार आहेत. नोकरीत  वरीष्ठांना मान द्यावा लागेल. 

 • मिथुन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३

घरात वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायात आज न झेपणारी रीस्क घेऊच नका. गृहीणी दानधर्म करतील.

 • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४

कार्यक्षेत्रातील स्पर्धा तीव्र होईल. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही.   वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजतील. वाहन  चालवाना ओव्हरटेक टाळा. 

 • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ६

कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वास वाव मिळेल. तुम्हाला प्रोत्साहन देणारी मंडळी भेटतील. वैवाहीक जिवनांत सामंजस्य राहीलच, आज दोघांत तिसऱ्याला प्रवेश नको. 

 • कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ५

ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट गरजेचे आहेत परंतू कष्टांचा अतिरेकही तब्येत बिघडण्यास कारणीभूत होऊ शकतो. आज योग्य  विश्रांतीही गरजेची राहील. 

 • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८

आज मुलांच्या वाढत्या मागण्या पुरवण्यासाठी खर्च कराल. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. ज्येष्ठांना प्रकृती साथ देईल.  

 • वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ७

व्यवसायात आवक चांगली राहील. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील.  प्रेम प्रकरणे मात्र बोअरच करतील.  गृहीणींनी आज झाकली मुठ झाकलीच ठेवावी. 

 • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

बराचसा वेळ कामानिमित्त घराबाहेरच जाईल. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह टाळलेला बरा.  आज शेजारी घरात डोकावतील पण प्रेमानेच. सामान्य दिवस.

 • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. खर्चाचे प्रमण वाढेल पण पैशाची कमतरता भासणार नाही. क्षुल्लक कारणाने शेजाऱ्यांशी मतभेद होतील.

 • कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास असणार आहे. 

 • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील. 

बातम्या आणखी आहेत...