आजचे राशिभविष्य / जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात

रिलिजन डेस्क

Dec 03,2019 12:15:00 AM IST

मंगळवार 3 डिसेंबर रोजी धनिष्ठानक्षत्र असल्यामुळे व्याघात नावाचा अशुभ योग जुळून येत आहे. या योगाचा प्रभाव सर्व राशीच्या लोकांवर राहील. अशुभ योगामुळे मंगळवारी 12 पैकी 7 राशीच्या लोकांनी सांभाळून राहण्याची आवश्यकता आहे. या व्यतिरिक्त इतर ग्रहांची स्थिती पाच राशीवर शुभ प्रभाव टाकेल.


येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : अबोली | अंक : २

आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असल्याने तुम्ही कोणतेही काम आत्मविश्वासाने कराल. कार्यक्षेत्रात पूर्वीच्या कष्टांची फळे दृष्टीक्षेपात येतील.छान दिवस.

  • वृषभ: शुभ रंग : सोनेरी | अंक : १

आज भावनेपेक्षा कर्तव्यासच प्राधान्य द्याल. व्यवसायात उध्दीष्टे गाठण्यासाठी कामाचे तास वाढवावेच लागणार आहेत. नोकरीत वरीष्ठांना मान द्यावा लागेल.

  • मिथुन : शुभ रंग : पिवळा | अंक : ३

घरात वडीलधाऱ्यांना अभिमानास्पद वाटणारी एखादी कामगिरी तुमच्या हातून होईल. व्यवसायात आज न झेपणारी रीस्क घेऊच नका. गृहीणी दानधर्म करतील.

  • कर्क : शुभ रंग : सोनेरी | अंक : ४

कार्यक्षेत्रातील स्पर्धा तीव्र होईल. स्पर्धकांना कमजोर समजून चालणार नाही. वडीलधारी मंडळी उपदेशांचे डोस पाजतील. वाहन चालवाना ओव्हरटेक टाळा.

  • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ६

कार्यक्षेत्रात तुमच्या कतृत्वास वाव मिळेल. तुम्हाला प्रोत्साहन देणारी मंडळी भेटतील. वैवाहीक जिवनांत सामंजस्य राहीलच, आज दोघांत तिसऱ्याला प्रवेश नको.

  • कन्या : शुभ रंग : भगवा | अंक : ५

ध्येय साध्य करण्यासाठी कष्ट गरजेचे आहेत परंतू कष्टांचा अतिरेकही तब्येत बिघडण्यास कारणीभूत होऊ शकतो. आज योग्य विश्रांतीही गरजेची राहील.

  • तूळ : शुभ रंग : जांभळा | अंक : ८

आज मुलांच्या वाढत्या मागण्या पुरवण्यासाठी खर्च कराल. कलेच्या क्षेत्रात काम करणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. ज्येष्ठांना प्रकृती साथ देईल.

  • वृश्चिक : शुभ रंग : केशरी | अंक : ७

व्यवसायात आवक चांगली राहील. कुटुंबात सामंजस्याचे वातावरण राहील. प्रेम प्रकरणे मात्र बोअरच करतील. गृहीणींनी आज झाकली मुठ झाकलीच ठेवावी.

  • धनू : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९

बराचसा वेळ कामानिमित्त घराबाहेरच जाईल. हातचे सोडून पळत्यामागे धावायचा मोह टाळलेला बरा. आज शेजारी घरात डोकावतील पण प्रेमानेच. सामान्य दिवस.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ७

अत्यंत उत्साही व आनंदी असा आजचा दिवस. खर्चाचे प्रमण वाढेल पण पैशाची कमतरता भासणार नाही. क्षुल्लक कारणाने शेजाऱ्यांशी मतभेद होतील.

  • कुंभ : शुभ रंग : आकाशी | अंक : ३

फारच स्वछंदीपणे वागण्याकडे तुमचा कल राहील. तरूण मंडळींना बंधने नकोशी वाटतील. आज आपले तेच खरे करण्याचा तुमचा अट्टहास असणार आहे.

  • मीन : शुभ रंग : पांढरा | अंक : ८

व्यावसायिक मंडळी अधिक गुंतवणूकीस प्राधान्य देतील. नोकरीत अधिकारी वर्गास दूरचे प्रवास घडतील. आज पर्यटन व्यवसाय तेजीत चालतील.

X
COMMENT