Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस राहील खास. करिअरमध्ये पुढे जाण्याची मिळेल संधी, जॉब आणि बिझनेसमध्ये होऊ शकतो फायदा...

रिलिजन डेस्क

Sep 03,2019 12:25:00 AM IST

मंगळवार, 3 सप्टेंबर 2019 ला शुभ योग जुळून येत असल्यामुळे 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. मंगळवारी चित्रा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे ब्रह्मा नावाचा शुभ योग तयार होत आहे. या ग्रहस्थितीच्या शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ३ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.वृषभ : शुभ रंग : पिवळा | अंक : १ आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. गर्भवतींना सुदृढ संततीचा लाभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल.कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २ भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. गृहीणींना माहेरची ओढ लागेल.सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : १ रिकामटेकडया चर्चा टाळा कारण त्यातून निष्पंन्न काहीच होणार नाही. आज शेजारी अडचणीत मदत करायला तत्पर असतील. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शक्यताे.कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४ आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.तूळ : शुभ रंग : तांबडा | अंक : ५ व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ७ तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ६ नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे.मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ८ थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.

मेष : शुभ रंग : मरून | अंक : ३ ऐकावे जनाचे पण करावे मनाचे असेच तुमचे आज धोरण असेल. मोफत सल्ला देणाऱ्या मंडळींच्या नादी लागू नका, परंतू आज पत्नीचा सल्ला डावलू नका.

वृषभ : शुभ रंग : पिवळा | अंक : १ आज काही आरोग्याच्या तक्रारी त्रस्त करतील. जुने आजार पुन्हा डोके वर काढण्याची शक्यता आहे.काही येणी असतील तर वसूल होऊ शकतील.

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : २ प्रॉपर्टी खरेदी विक्रीच्या कामातील विघ्नं दूर होतील. विद्यार्थी अभ्यास मनावर घेतील. गर्भवतींना सुदृढ संततीचा लाभ होईल. कलाकारांचे कौतुक होईल.

कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : २ भावना व कर्तव्य याचा मेळ घालणे कठीण जाईल. महत्वाकांक्षांच्या आहारी जाताना आपल्या मर्यादाही ओळखणे गरजेचे आहे. गृहीणींना माहेरची ओढ लागेल.

सिंह : शुभ रंग : केशरी| अंक : १ रिकामटेकडया चर्चा टाळा कारण त्यातून निष्पंन्न काहीच होणार नाही. आज शेजारी अडचणीत मदत करायला तत्पर असतील. वाहन दुरुस्तीचा खर्च उद्भवू शक्यताे.

कन्या : शुभ रंग : चंदेरी| अंक : ४ आर्थिक बाजू भक्कम राहील. योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन कामी येईल. पूर्वीच्या गुंतवणूकीतून चांगला परतावा मिळेल. वादविवादात सरशी होईल.

तूळ : शुभ रंग : तांबडा | अंक : ५ व्यवसायात कामाचे तास वाढवावे लागतील. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी आपल्या काही तत्वांना मुरड घालावी लागेल. अहंकार टाळून हितसंबंध जपणे गरजेचे आहे.

वृश्चिक : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ३ आज तुमचा जास्त वेळ घराबाहेरच जाईल. बेरोजगारांना घरापासून लांब कामाच्या संधी येतील. उच्चशिक्षितांना विदेश गमनाच्या संधी खुणावतील. खर्च वाढणार आहे.

धनू : शुभ रंग : भगवा | अंक : ७ तुमच्यावर मित्रमंडळींचा प्रभाव राहील. मोठेपणा सिध्द करण्यासाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. सायंकाळी एखाद्या चित्रपटाचा आस्वाद घ्याल. आनंदी दिवस.

मकर : शुभ रंग : सोनेरी | अंक : ९ व्यवसायात पूर्वीचे नियम बदलावे लागणार आहेत. मागणी तसा पुरवठा करणे गरजेचे आहे. काही मोठया लोकांच्या ओळखी आपल्या स्वर्थासाठी वापरून घ्या.

कुंभ : शुभ रंग : मोतिया| अंक : ६ नोकरीत उच्च्पदस्त असाल तर काही पेचप्रसंग सोडवावे लागतील. काही मनस्ताप देणारी मंडळीही भेटणार आहेत. हाताखालच्या लोकांशी मिळून मिसळून रहावे.

मीन : शुभ रंग : राखाडी | अंक : ८ थोडेफार नैराश्य जाणवेल. काही क्षुल्लक गोष्टी कारण नसताना मनाला लावून घ्याल. भिडस्तपणा मुळे काही चांगल्या संधी हातातून निसटू शकतील.
X
COMMENT