Todays horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

मंगळवारचे राशिफळ : महिन्यातील शेवटच्या दिवसाची सुरुवात होत आहे शुभ योगात, 12 पैकी या 7 राशीच्या लोकांसाठी मंगळवार राहील खास...

रिलिजन डेस्क

Apr 30,2019 01:52:42 PM IST

एप्रिल महिन्यातील शेवटच्या दिवसाचे (मंगळवार, 30 एप्रिल) ग्रह-तारे आणि नक्षत्र ऐंद्र नावाचा शुभ योग तयार करत आहेत. या शुभ योगाच्या प्रभावामुळे बहुतांश लोकांसाठी दिवस चांगला राहील. ग्रहांच्या प्रभावामुळे अडचणी नष्ट होतील. समस्येतून मार्ग सापडेल. ठरवलेली कामे पूर्ण होऊ शकतात. या शुभ योगांचा फायदा विशेषतः 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. इतर राशींसाठीसुद्धा दिवस संमिश्र फळ देणारा राहील...


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष - व्यावसायिक भरभराट होईल. घराबाहेर तुमच्या कतृत्वाचा प्रभाव पडेल. तुमचा उत्साह इतरांस प्रेरणा देईल. आज रिकामटेकडया गप्पांतून वाद होतील. शुभ रंग : डाळिंबी, अंक- १वृषभ - पैशाची आवक जेमतेमच राहील. आज निर्णय घेण्यात घाई करु नका. व्यावसायिकांनी हितसंबंध जपायला हवेत. फटकळपणास आवर घालणे गरजेचे. शुभ रंग : गुलाबी, अंक, -२मिथुन - कौटुंबिक सुखात तसेच तुमच्या मानसन्मानात वृध्दी होईल. काही भाग्यवंतांची वास्तूविषयक स्वप्ने साकार होतील. महिलांचे गृहोद्योग तेजीत चालतील. शुभ रंग:अबोली, अंक-३.कर्क - नोकरीच्या ठीकाणी कामात चूक न होण्याची काळजी घेणे गरजेचे आहे. व्यवसायात मनाजोगती प्रगती करु शकाल. घरात आर्थिक सुबत्ता नांदेल. शुभ रंग : चंदेरी, अंक-४.सिंह - तुमच्या भावी योजना आत्ताच उघड करु नका. वादास आमंत्रण देणरी वक्तव्ये टाळा. अनावश्यक मेहनत टाळून वेट अॅन्ड वॉच चे धोरण स्विकारा. शुभ रंग : पांढरा, अंक-५.कन्या - अतीश्रम झाल्याने तब्येत बिघडण्याची शक्यता. कुणाकडून आज काही अपेक्षा करु नका. आपण बरे व आपले काम बरे हे धोरण हिताचे राहील. शुभ रंग : पोपटी, अंक-७.तूळ - प्रकृती स्वास्थ्य छान असून मन प्रसन्न असेल. तरीही आनंदाच्या भरात कुणाला काही वचने देऊ नका. प्रेमप्रकरणे विवाहाच्या दिशेने वाटचाल करतील. शुभ रंग : पिस्ता, अंक-७.वृश्चिक - आवक आणि जावक यांचा मेळ साधणे कठीण जाईल. घरातील थोरांची मने सांभाळावी लागतील. आज आवाक्या बाहेरील जबाबदाऱ्या स्विकारु नका. शुभ रंग:स्ट्रॉबेरी, अंक- ८.धनू - तरुण वर्गाने प्रलोभनांस बळी जाऊ नये. धाडसी कृत्ये टाळावीत. अापल्या मर्यादा ओळखून वागलेले बरे. अती आक्रमकतेने निराशाच पदरी पडेल. शुभ रंग :मोतिया, अंक-९.मकर - वाहन किंवा वास्तू खरेदीचे योग जुळून येतील. कौटुंबिक वातावरण सौख्यपूर्ण राहील. विद्यार्थी अभ्यासात मन एकाग्र करतील. गृहीणींना माहेरची ओढ लागेल. शुभ रंग : सोनेरी, अंक-१.कुंभ - सहकुटुंब प्रवास घडतील.प्रवासातील काही ओळखी भविष्यात कामी यतील. लेखक व कवींना वाचकवर्ग मिळेल. विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे दुर्लक्ष होईल. शुभ रंग : केशरी, अंक-२.मीन - व्यवसायात अडकलेला पैसा वसूल होण्याची शक्यता आहे. आज फार सडेतोड बोलू नका. आज गोड बोलून आपला कार्यभाग साधून घेणे गरजेचे. शुभ रंग : आकाशी, अंक-३.
X
COMMENT