आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील वर्षातील शेवटचा दिवस

2 वर्षांपूर्वीलेखक: रिलिजन डेस्क
  • कॉपी लिंक

आज वर्षातील शेवटचा दिवस मंगळवार 31 डिसेंबरला सिद्धी नावाचा शुभ योग तयार होत आहे.शतभिषा नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांना विशेष लाभ होईल. या राशीच्या लोकांना एक्स्ट्रॉ इन्कम होऊ शकते. सेव्हिंगही वाढेल. बिझनेस करणाऱ्या लोकांना गुंतवणुकीतून लाभ होईल. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकासांठी दिवस सामान्य राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : राखाडी | अंक : ३

सर्वच दृष्टीने अनुकूल असा दिवस सत्कारणी लावा. जिवलग मित्रांकडून अपेक्षित सहकार्य मिळेल.कर्जप्रस्ताव मंजूर होऊ शकतील. हितशत्रू पळ काढतील.

  • वृषभ: शुभ रंग : अबोली | अंक : १

नोकरीत अधिकारी वर्गाकडून उत्तम सहकार्य मिळेल. तुमच्या कार्यनिष्ठेची दखल घेतली जाईल. आज तुम्ही जरा मुलांच्या तब्येतीकडे लक्ष देणे गरजेचे आहे.     

  • मिथुन : शुभ रंग : सोनेरी | अंक : ६

घरात वडीलधारी मंडळी त्यांची मते तुमच्यावर लादण्याचा प्रयत्न करतील. कामधंद्यातील अडचणी  मानसिक  स्वास्थ्य बिघडवतील. आज एकांत हवासा वाटेल. 

  • कर्क : शुभ रंग : पांढरा | अंक : ९

मोठया आर्थिक उलाढाली टाळायला हव्यात. आज विश्वासातील माणसाकडूनही विश्वासघात होऊ शकेल. स्पर्धकांना कमजोर समजण्याची चूक करू नका.

  • सिंह : शुभ रंग : मोतिया | अंक : ७

व्यवसायात भागिदारांशी सलोख्याचे संबंध राहतील.वैवाहीक जिवनांत खेळीमेळीचे वातावरण असून काही  जुन्या स्मृती मनास आनंद देतील. आशादायी दिवस.

  • कन्या : शुभ रंग : आकाशी | अंक : ८

कार्यक्षेत्रात हितशत्रूंचा उपद्रव वाढणार आहे. तरूणांनी व्सनसंपासून दूर रहाणे गरजेचे आहे. कुसंगत टाळावी. नोकरदारांनी कामाशी प्रामाणिक रहाणे गरजेचे आहे.

  • तूळ: शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ६

कौटुंबिक वातावरण अत्यंत उत्साही राहील. गृहीणी आवडत्या छंदास वेळ देतील. नवोदीत कलाकारांना ग्लॅमरची चव चाखता येईल. विद्यार्थ्यांना सुयश. 

  • वृश्चिक : शुभ रंग : मोरपंखी | अंक : ३

आज दैनंदीन कामे सुरळीत पार पडतील. आवक पुरेशी राहील. जागाविषयक प्रश्न सुटतील. प्रेमप्रकरणांत मात्र नसती आफत होईल, सांभाळा. 

  • धनू : शुभ रंग : केशरी| अंक : ३

आजचा दिवस धावपळीत जाईल. एखाद्या अनुकूल घटनेने तुमचा आत्मविश्वास वाढेल. काहींंना प्रवासाचे याेग अटळ आहेत. नव्या ओळखी होतील.

  • मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ५

पूर्वीच्या कष्टांचे फळ पदरात पडण्याचा दिवस आहे.घरात पाहुण्यांची वर्दळ राहील. वैवाहीक संबंधात गोडवा राहील. गृहलक्ष्मी व मुले हसतमुख असतील.

  • कुंभ : शुभ रंग : मरून | अंक : २

अती स्पष्टवक्तेपणा मुळे हितसंबंधात कटुता येण्याची शक्यता आहे. आज डोके थंड व वाणीत गोडवा ठेवलात तर अनेक क्लीष्ट कामेही सोपी होतील.

  • मीन : शुभ रंग : पिस्ता | अंक : १

कमी कष्टात जास्त लाभाच्या मोहाने निराशाच पदरी पडेल. काही महत्वाच्या कामानिमित्त बरीच पायपीट होण्याची शक्यता आहे. काही बिले भरावी लागतील.

बातम्या आणखी आहेत...