आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 5 नोव्हेंबर 2019 ला धनिष्ठा नक्षत्र असल्यामुळे वृद्धी नावाचा शुभ योग जुळून येत आहे. याच्या प्रभावाने 12 पैकी 4 राशीचे लोक विविध कामामध्ये भाग्यशाली राहतील. या व्यतिरिक्त चार राशीच्या लोकांसाठी दिवस शुभ राहील. या लोकांना नोकरी आणि बिझनेसमध्ये फायदा होऊ शकतो. प्रगती होण्याचे योग जुळून येत आहेत. या व्यतिरिक्त इतर चार राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष: शुभ रंग : मरून | अंक : ६ 
आज फक्त आपले कर्तव्य सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. तुमच्या कामातील व्यस्ततेने आज तुम्हाला कुटुंबियांची नाराजी मात्र पत्करावी  लागेल.

वृषभ: शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४
नवीन व्यावसायिकांनी आपल्या मर्यादा ओळखूनच आर्थिक धाडस करावे. अती आक्रमकतेने निराशा पदरी पडण्याची शक्यता.  संयमाची गरज आहे.

मिथुन : शुभ रंग : हिरवा | अंक : १
आज जे काही कराल ते करताना आधी प्रकृतीस जपा. एकावर विसंबून दुसऱ्यास अश्वासने देऊ नका. आज मोठया आर्थिक उलाढाली टाळलेल्याच बऱ्या.  


कर्क :  शुभ रंग : क्रिम | अंक
: ८ 
आज तुमचे मनोबल उत्तम असेल. कार्यक्षेत्रात उभी असलेली नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. वैवाहीक जिवनांत सौख्य आणि समाधान राहील. 

सिंह : शुभ रंग : अबोली | अंक : ९
आज ज्येष्ठ मंडळींनी प्रकृतीकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. श्वसनाचे विकार असतील तर विषेश काळजी घ्यायला हवी. आज पैजा जिंकाल.

कन्या : शुभ रंग : पिस्ता | अंक : ७
व्यावसायिक उलाढाल वाढेल. शेअर्स बाजारातील तुमचे अंदाज योग्यच ठरतील. नवीन नोकरीच्या शोधात असणाऱ्यांना उत्तम संधी चालून येतील. यशदायी दिवस. 

तूळ : शुभ रंग : गुलाबी| अंक : ५
बांधकाम व्यावसायिकांसाठी आज विषेश अनुकूल दिवस आहे. स्थावराची खरेदी विक्री फायद्यात राहील. मुलांना दिलेले शब्द पाळल. गृहसौख्याचा दिवस. 

वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ६
आज काही मनाजोगत्या घटना घडतील. भावंडांतील मतभेद दूर होऊन सलोखा निर्माण होईल. बेरोजगारांना रोजगार प्राप्ती होईल.  आईच्या प्रकृतीची काळजी घ्या.  


धनू :  शुभ रंग : पांढरा | अंक
: २
जमेची बाजू जड असून नोकरी धंद्यात उत्साहाचे वातावरण राहील. आज वाणीत मृदुता असेल तर अनेक क्लीष्ट कामे सोपी होतील. वक्तृत्वास वाव मिळेल.  

मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ४
आज तुम्ही हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून न घेता आपलेच खरे करण्याकडे  तुमचा कल राहील. सडेतोड बोलण्याच्या तुमच्या स्वभावामुळे काही नाती दूरावतील.  

कुंभ : शुभ रंग : मोतिया | अंक : ३
खर्च आवाक्या बाहेर जाईल. आज काही दूरचे नातलग  संपर्कात येतील. ज्येष्ठ मंडळींचे अध्यात्मात मन रमेल. पासपोर्ट, वीजा विषयी कामातील अडथळे दूर होतील. 

मीन : शुभ रंग : जांभळा | अंक : १
आज तुमच्यासाठी इच्छापूर्तीचा दिवस असून आज तुम्ही जी म्हणाल ती पूर्व करूनच दाखवाल.  गृहीणी आपल्या आवडत्या छंदास वेळ देतील. दिवस लाभाचा. 

बातम्या आणखी आहेत...