आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार, 7 डिसेंबर 2020 रोजी कृत्तिका नक्षत्रामध्ये सूर्योदय होत आहे. आजची ग्रहस्थिती शुभ नावाचा खास योग तयार करत आहे.या शुभ योगाच्या प्रभावाने 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस चांगला राहील. शुभ प्रभावामुळे काही लोकांना करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. जॉब आणि बिझनेससाठी दिवस चांगला राहील. धनलाभही होईल. कामातील अडचणी दूर होतील. इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • मेष: शुभ रंग : तांबडा | अंक : २

आज नवीन झालेले परिचय फायदेशीर ठरणार आहेत. परिवारासाठी वेळ देणे मात्र कठीण जाईल.   सामाजिक  कामे करणाऱ्यांना लोकांकडून आदर प्राप्त होईल.

  • वृषभ: शुभ रंग : पिस्ता | अंक : १

कोणत्याही स्पर्धेत आज अंतिम विजय तुमचाच राहील. आज स्वत:ची हौस मौज पुरवण्यासाठी सढळ हस्ते पैसे खर्च कराल. जिथे जाल तिथे आपलीच मर्जी चालवाल. 

  • मिथुन : शुभ रंग : पोपटी | अंक : ७

काही कामासाठी तातडीने प्रवासास निघावे लागेल. गृहीणींना आज क्षणभरही उसंत मिळणे कठीण अाहे.जमाखर्चाचा मेळ बसवणे अवघड जाईल. व्यस्त दिवस. 

  • कर्क : शुभ रंग : मोतिया | अंक : ८

आजचा दिवस तुमच्यासाठी लाभाचा असून आज तुमच्यासाठी उत्पन्नाचे विवध मार्ग तयार होतील.पूर्वीच्या कष्टांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. 

  • सिंह : शुभ रंग : मरून | अंक : ९

कार्यक्षेत्रात नवी आव्हाने सकारात्मकतेने स्विकाराल.आपले काम सोडल्यास इतर गोष्टी तुमच्यासाठी गौण असतील. कुटुंबियांची नाराजी पत्करावी लागू शकते.

  • कन्या : शुभ रंग : पांढरा | अंक : ७

कारण नसताना इतराच्या भानगडीत पडण्याचा मोह होईल. पण तसे न करता फक्त आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रीत करणे गरजेचे. स्वावलंबनानेच कामे होतील. 

  • तूळ: शुभ रंग : मोरपिशी | अंक : ४

आत्मविश्वासाने विपरीत परिस्थितीशी झुंज द्याल. वैवाहीक जिवनांत किरकोळ वाद संभवतात पण फार ताणून धरु नका. सासूरवाडीकडून काही लाभ संभवतो. 

  • वृश्चिक : शुभ रंग : राखाडी | अंक : ६

व्यापारी वर्गाची बाजारातील पत वाढेल. तुमचा कामातील उत्साह पाहून विरोधकही प्रभावित होतील.आज जोडीदारास दिलेले शब्द पाळणे हिताचे राहील.

  • धनू : शुभ रंग : जांभळा| अंक : १

हट्टीपणा  सोडून संयमाने वागण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात  स्पर्धकांवर सहजपणे मात करु शकाल. जोडीदाराच्या चूका काढायची चूक करू नका.

  • मकर : शुभ रंग : स्ट्रॉबेरी| अंक : ५

पतप्रतिष्ठा वाढेल. आज आप्तस्वकीयात तुमच्या शब्दास मान राहील. जे काही मनात आणाल ते तडीस न्याल. हितशत्रू पळवाट शोधतील. यशदायी दिवस. 

  • कुंभ : शुभ रंग : गुलाबी | अंक : ३

जागेसंबंधीत महत्वाचे व्यवहार मार्गी लागतील.वेळीच घेतलेले योग्य निर्णय व वेळेचे योग्य नियोजन यामुळे यशाचा मार्ग सोपा होईल. गृहसैख्य लाभेल.

  • मीन : शुभ रंग : केशरी | अंक : २

आज संमिश्र फळे देणारा दिवस असून आवक जावक समान राहील. शब्द जपून वापरल्यास वाद टाळता येतील. थोरामोठयांंच्या वयाचा मान राखा. 

बातम्या आणखी आहेत...