आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मंगळवार 08 ऑक्टोबर 2019 रोजी श्रवण नक्षत्रामध्ये सूर्योदय होत असल्यामुळे धृती नावाचा एक शुभ योग जुळून येत आहे. यासोबतच आज नवरात्रीमधील विजयादशमी आहे. यामुळे आजचा दिवस विशेष शुभ राहील. आजच्या ग्रहस्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी आठ राशींसाठी चांगला राहील. धृती योग कुटुंब आणि कार्यक्षेत्रासाठी शुभ राहील. या योगाच्या प्रभावाने कौटुंबिक वातावरण चांगले राहील. एखाद्या गोष्टीचा वाद चालू असेल तर तो आज संपुष्टात येईल. इतर चार राशीच्या लोकांसाठी आजचा दिवस संमिश्र फळ देणारा राहील.

येथे जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार....

मेष : शुभ रंग : स्ट्रॉबेरी | अंक : ५
आज तुम्ही फार हट्टीपणाने वागाल. कुणाचेही ऐकून घेण्याची तुमची तयारी नसेल. अधिकारांचा गैरवापर मात्र महागात पडेल. सामंजस्याचे धोरण हिताचे राहील.

वृषभ: शुभ रंग : केशरी | अंक : ४
नोकरदारांना कामाचा प्रचंड ताण जाणवेल. वरीष्ठांच्या मागे पुढे करावेच लागणार आहे. कोणतेही कौटुंबिक निर्णय वडीलधाऱ्यांच्या संगनमताने घ्यावे लागतील. 

मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८
कंटाळवाणा  दिवस. दैनंदीन कामातही अडचणींचा सामना करावा लागेल. जे काही कराल ते तब्येतीस जपूनच करा. विवाह जुळवण्याविषयी चर्चा आज नकोतच.   

कर्क :  शुभ रंग : क्रिम | अंक :
व्यावसायिक उलाढाल वाढेल. खर्च योग्य कारणांसाठीच होईल. काही दूरावलेली नाती जवळ येतील. वैवाहीक जिवनांत आज दाेघांत तिसऱ्याला प्रवेश देऊच नका. 

सिंह : शुभ रंग : मोतिया| अंक : ४
वादविवादात आज  स्वत:चेच खरे कराल. आर्थिक व्यवहारात मात्र सावध रहाणे गरजेचे. आज एकाच्या भरवशावर दुसऱ्याला शब्द देऊ नका. तब्येत सांभाळा.     

कन्या : शुभ रंग : जांभळा| अंक : २
सौंदर्य प्रसाधने, चैनीच्या वस्तूंचे व्यवसाय तेजीत चालतील. ऐशआरामी वृत्ती बळावेल. गृहीणी आज ब्युटी पार्लरसाठी आवर्जुन वेळ काढतील. छान दिवस. 

तूळ : शुभ रंग : मरून| अंक : ३
आज तुमच्यासाठी गृहसौख्याचा दिवस. कामावर दांडी मारून घरी आराम करायचा मूड राहील. आज काही घरगुती प्रश्नांत लक्ष घलाल मुलांना वेळ द्याल 

वृश्चिक : शुभ रंग : क्रिम| अंक : ५
आज तुमचा बराचसा वेळ घराबाहेरच जाणार आहे. इतरांना मदत करण्यास तत्पर असाल. जुन्या मित्रांच्या भेटीत गतस्मृतींना उजाळा द्याल. नवे परिचय होतील.  


धनू :  शुभ रंग : चंदेरी| अंक
: ७
आज पैशाची आवक मनाजोगती राहील. नवी आव्हाने आत्मविश्वासाने स्विकाराल. सज्जनांच्या सहवासात विचार प्रगल्भ होतील. आज प्रवासात खाेळंबा होईल.

मकर : शुभ रंग : गुलाबी | अंक : ९
आज तुम्ही एखादी क्षुल्लक गोष्ट फारच मनाला लाऊन घ्याल. नोकरीच्या ठीकाणी कामाचे दडपण येईल. आज अनावश्यक जबाबदाऱ्या वेळीच झटकून टाकणे गरजेचे.  

कुंभ : शुभ रंग : राखाडी | अंक : ६
कार्यक्षेत्रात सावधगिरीने पावले उचला. कोणतेही निर्णय उताविळपणे घेऊ नका. आज तुम्हाला काही पूर्वीच्या चूका निस्तराव्या लागतील. संयम ठेवा.   

मीन : शुभ रंग : सोनेरी | अंक : १
आज तुमच्यासाठी ईच्छापूर्तीचा दिवस असल्याने कार्यक्षेत्रात पूर्वी केलेले कष्ट कारणी लागतील. विरोधकही तुमचे कतृत्व मान्य करतील. छान दिवस.                 

बातम्या आणखी आहेत...