Home | Jeevan Mantra | Jyotish | Rashi Nidan | tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

रिलिजन डेस्क | Update - Apr 09, 2019, 12:01 AM IST

मंगळवार राशीफळ : शुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात, जाणून घ्या तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    मंगळवार, 9 एप्रिल 2019 रोजी कृत्तिका नक्षत्रामुळे आयुष्मान व सौभाग्य नावाचे दोन शुभ योग जुळून येत आहेत. याचा 9 राशींवर चांगला, तर 3 राशींवर संमिश्र प्रभाव राहील. याचा थेट परिणाम तुमच्या जॉब व बिझनेसवर पडणार आहे. या प्रभावामुळे काही राशींना एक्स्ट्रा इन्कम होईल. इतर तीन राशीच्या लोकांसाठी आजचा डायस संमिश्र फळ देणारा राहील.


    पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    मेष : आज काही दूरावलेले नातेसंबंध परत जवळ येतील. पूर्वीच्या अथक परिश्रमांचे फळ दृष्टीक्षेपात येईल. विवाहेच्छूकांना अपेक्षित स्थळांचे प्रस्ताव येतील. शुभ रंग : मरून | अंक : ८ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    वृषभ : काही व्यावसायिक उद्दीष्टे पूर्ण करण्यासाठी अथक परिश्रमांची तयारी असायला हवी. आज कतृत्ववान व्यक्तींचा सहवास लाभेल. अत्यंत व्यस्त दिवस.  शुभ रंग : क्रिम | अंक : ६ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    मिथुन : अत्यंत व्यस्त दिवस असून नोकरीत अधिकार प्राप्त होणार आहेत. कामाचेही दडपण जाणवणार आहे. काही वाढीव जबाबदाऱ्या टाळता येणार नाहीत. शुभ रंग : नारिंगी | अंक : ४ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    कर्क : तरुणांनी हौसमौज करताना मर्यादेत रहावे.नितीबाह्य वर्तनाने प्रतिष्ठा धोक्यात येण्याची शक्यता आहे. आज स्वयंपाकघरात थोडी आदळ आपट संभवते. शुभ रंग : पिस्ता | अंक : ७ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    सिंह : कार्यक्षेत्रात एखाद्या मनासारख्या घटनेने तुमचा उत्साह वाढेल. महत्वाच्या वाटाघाटी करण्यासाठी आज दिवस अनुकूल आहे. विवाह जुळवण्यात मध्यस्ती कराल. शुभ रंग : मोरपंखी | अंक : ४ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    कन्या : कामगारांच्या रास्त मागण्या वरीष्ठांकडून मान्य होतील.बेरोजगारांना रोजगार मिळेल. काही जुने आजार दार ठोठवाणार आहेत. आरोग्याच्या बाबतीत जागरुक रहा. शुभ रंग :गुलाबी | अंक : ५ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    तूळ : आज तुमचा अत्याधुनिक रहीणीमानाकडे कल असेल.चैनी व विलासी वृत्ती जोपासाल. प्रिय व्यक्तीच्या भावना जपण्याचा प्रयत्न कराल. प्रेमप्रकरणे छान रंगतील. शुभ रंग : भगवा | अंक : ३ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    वृश्चिक : अनपेक्षितपणे हाती पैसा येईल व तो जाण्याचे मार्गही प्रशस्त असतील. बचतीस प्राधान्य देणे गरजेचे राहील.प्रेमप्रकरणे डोक्याला ताप होतील. गृहीणींना उसंत नाही. शुभ रंग : केशरी | अंक : १ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    धनू : आज शेजाऱ्यांशी मिळून मिसळून रहावे. नोकरीतही सहकारी वर्गाशी जळवून घ्यावे लागणारआहे. कुणाच्या भावना दुखावणार नाहीत याची काळजी घेणे गरजेचे. शुभ रंग : भगवा | अंक : ३ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    मकर : पैशाच्या बाबतीत काहीच कमी पडणार नाही. आज सुसंवादाने अनेक कामे सोपी होतील. भावंडात मात्र क्षुल्लक गोष्टींवरुन मतभेद हाेण्याची शक्यता आहे. शुभ रंग : डाळिंबी | अंक : २ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    कुंभ : अथक प्रयत्नांच्या जोरावर यशाकडे तुमची घोडदौड चालूच राहील. आज तुमच्या काही अपुऱ्या स्वप्नांची पूर्तता होईल. एखाद्या कामासाठी भटकंती होईल.शुभ रंग : हिरवा | अंक : १ 

  • tuesday 9 april 2019 daily horoscope in Marathi

    मीन : एखाद्या धार्मिक कार्यात सहभागी व्हाल. अनावश्यक खर्च कमी करुनच जमाखर्चाचा तराजू समतोल ठेवता येईल. शुभ रंग : पांढरा | अंक : ८ 

Trending