Today's Horoscope / आजचे राशिभविष्य : जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार

अशुभ योगामध्ये होत आहे दिवसाची सुरुवात तरीही 12 पैकी 7 राशीच्या लोकांसाठी दिवस राहील खास, हे आहे कारण...

दिव्य मराठी

Jul 09,2019 12:25:00 AM IST

मंगळवार 9 जुलै 2019 ला हस्त नक्षत्र असल्यामुळे परीघ नावाचा अशुभ योग जुळून येत आहे परंतु हा योग दुपारी 12 वाजून 40 मिनिटांपर्यंत राहील आणि त्यानंतर शिवा नावाचा शुभ योग जुळून येत आहे. या ग्रह स्थितीचा शुभ प्रभाव 12 पैकी 7 राशीच्या लोकांना जास्त प्रमाणात होईल. शुभ योगाच्या प्रभावाने करिअरमध्ये पुढे जाण्याची संधी मिळेल. नशिबाची साथ मिळू शकते. पैशाशी संबंधित अडचणी नष्ट होऊ शकतात. या व्यतिरिक्त इतर पाच राशीच्या लोकांसाठी दिवस संमिश्र फळ देणारा राहील.


पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, तुमच्या राशीसाठी कसा राहील मंगळवार...

मेष : शुभ रंग : राखाडी | अंक : ९ परिवारात स्वछंदी वातावरण राहील. कलाक्रीडा क्षेत्रातील मंडळींना उत्तम संधी चालून येतील. आज प्रिय व्यक्तींच्या सहवासात संध्याकाळ मजेत जाईल. वृषभ : शुभ रंग : तांबडा | अंक : ६ घरगुती समस्यांवर योग्य मार्ग मिळाल्याने निश्चिंत असाल. आवडत्या छंदास वेळ द्याल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. प्रेमी युगुलांना ग्रीन सिग्नल.मिथुन : शुभ रंग : पिस्ता | अंक : ८ महत्वाचे निर्णय घेताना द्विधा मन:स्थिती होईल.दगदग वाढेल. बेरोजगारांना आपल्या परिसरातच रोजगाराची संधी मिळेल. गृहीणींसाठी व्यस्त दिवस.कर्क : शुभ रंग : मरून | अंक : ७ पैसा येण्याचे विविध मार्ग उपलब्ध होतील. काही रखडलेली देणी देता येतील. वाणीत गोडवा ठेवून इतरांकडून कामे करून घेता येतील. आशादायी दिवस.सिंह : शुभ रंग :मोरपंखी |अंक : ४ चैनीसाठी सढळ हस्ते पैसा खर्च कराल. अधुनिक राहणीमानास प्राधान्य द्याल. आज वादविवादात आपल्याच मताशी ठाम रहाल. शब्द जपूनच वापरा.कन्या : शुभ रंग : अबोली |अंक : २ आज भविष्याच्या दृष्टीने काहीसे चिंतीत असाल. सुरक्षित गुंतवणूकीकडे तुमचा कल राहील. नवोदीत कलाकार नावारूपास येतील. थोरांशी मतभेद होतील.तूळ : शुभ रंग : पांढरा | अंक : ५ तुमचे कार्यक्षेत्रातील वर्चस्व वाढेल. नोकरीच्या ठीकाणी बढतीचे मार्ग खुले हाेतील. आज तुम्ही गप्पांपेक्षा कृतीस प्राधान्य द्याल. उच्चशिक्षीतांच्या अपेक्षा वाढतील.वृश्चिक : शुभ रंग : आकाशी | अंक : ३ नाेकरदारांना वरीष्ठांच्या दडपणाखाली काम करावे लागणार आहे. कुणावरही विसंबून राहू नका. स्वत: मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. दिवस कष्टांचा.धनू : शुभ रंग : केशरी | अंक : १ हाताखालची माणसे बंंड पुकारतील. गोड बोलून कामे करून घ्यावी लागतील. आज ज्येष्ठांना मानसिक शांती नामस्मरणातून मिळेल. गृहीणी दानधर्म करतील.मकर : शुभ रंग : निळा | अंक : २ आज काही मानापमानाच्या प्रसंगास तोंड द्यावे लागणार आहे. दिवस तितकासा अनुकूल नसल्याने जरा संयमाची गरज आहे. मोफत सल्ले देऊ नका.कुंभ : शुभ रंग : हिरवा | अंक : ४ आपल्या वक्तृत्वाने समोरच्यास प्रभावित कराल.काही चांगल्या घटनांनी तुमचे मनोबल वाढणार आहे. जोडीदारास एखादे सरप्राईझ गिफ्ट द्याल.मीन : शुभ रंग : डाळिंबी | अंक : ५ काही येणी असतील तर वसूल होण्याची शक्यता आहे.तब्येतीच्या काही करकोळ तक्रारी उद्भवतील. वेळीच डाँक्टरांचा सल्ला घ्या. व्यवसायात भिडस्तपणा नको.
X