आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुम्हाला ठाऊक आहे का... करिअरच्या सुरुवातीच्या काळात 'राणादा'ला करावे लागले होते 'हे' काम  

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः 'चालतंय की...' म्हणत प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारा अभिनेता म्हणजे हार्दिक जोशी.  'तुझ्यात जीव रंगला' या मालिकेतून हार्दिक घराघरांत पोहोचला आहे. कमी कालावधीतच तो घराघरातील अविभाज्य भाग बनला आहे. तुझ्यात जीव रंगला या मालिकेतील राणादाच्या भूमिकेने हार्दिकला खरी ओळख मिळवून दिली. 


हार्दिकचा अभिनयाचा हा प्रवास 2009 पासूनच सुरु झाला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्याने अनेक लहानमोठ्या भूमिका केल्या. याचकाळात त्याने बॉलिवूड चित्रपटांमध्ये साइड डान्सर म्हणूनही काम केले. अभिनेता अजय देवगणच्या ‘सन ऑफ सरदार’ या चित्रपटाच्या टायटल साँगमध्ये त्याने साइड डान्सर म्हणून काम केले होते. विशेष म्हणजे या गाण्यातील एक फोटो त्याने फेसबुकवर शेअर करत ‘माय वर्क’ असे कॅप्शनही दिले आहे.

हार्दिकने ‘अस्मिता’, ‘राधा ही बावरी’, ‘दुर्वा’, ‘स्वप्नांच्या पलीकडले’ यासारख्या मराठी मालिकांमध्ये काम केले. तसंच मकरंद अनासपुरेच्या ‘रंगा पतंगा’ चित्रपटात त्याने एसीपी पाठक नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे.  ‘क्राईम पेट्रोल’ या कार्यक्रमातही त्याने छोटेखानी भूमिका साकारली होती.