आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराकलर्स मराठीवरील अस्सल पाहुणे इरसाल नमुने कार्यक्रमामध्ये दर आठवड्याप्रमाणे या आठवड्यामध्ये देखील प्रेक्षकांची दोन लाडकी व्यक्तिमत्व येणार आहेत. या आठवड्यामध्ये मातीशी नातं आणि कामाशी इमान जपणारे सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे यांनी कार्यक्रमामध्ये हजेरी लावली आहे. त्यांनी आपल्या कारकिर्दीत आलेले अनेक अनुभव, गोष्टी सांगितल्या.
सयाजी शिंदे यांनी त्यांच्या आई बरोबरचे काही किस्से या वेळी शेअर केले. सयाजी शिंदे आणि तुकाराम मुंढे यांना मकरंद यांनी काही प्रश्न देखील विचारले आहेत. सयाजी यांना विचारले कोणाला उभे करण्यासाठी कष्ट घ्यावेत माणूस की झाड ? त्यावर ते म्हणाले झाड. तर तुकाराम यांना विचारले कोणत्या फोनचं टेन्शन येतं वर्षा बंगला की अर्चना वहिनींच्या ? याच उत्तर प्रेक्षकांना कार्यक्रमामध्ये मिळेल.
तुकाराम मुंढे यांनी खंत देखील व्यक्त केली की, माझ्यासारखे 10 अधिकारी तयार होऊ शकतील पण माझा हा प्रश्न आहे की, तुम्ही एक अधिकारी टिकऊ शकत नाहीत, 10 अधिकारी कसे तयार होतील? 10 नव्हे तर शंभर अधिकारी कसे तयार होऊ शकतील याचा खुलासा देखील त्यांनी यावेळी केला. सयाजी शिंदे यांनी हाती घेतलेल्या “वनराई” उपक्रमाच्या प्रवासाबद्दल सांगितले आणि झाडे आणि पर्यावरणाविषयी प्रेम व्यक्त करत प्रत्येकाने एकतरी झाड लावा आणि जगवा असं आवाहन त्यांनी कार्यक्रमाद्वारे केलं.
सोलापूरमध्ये व्हीव्हीआयपी पासेस बंद का केले, या प्रश्नाचं उत्तर मुंढेंनी चक्रव्यूह राऊंडमध्ये दिलं. त्याचप्रमाणे स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांनी मोलाचा सल्ला दिला. यावेळी मनाला चटका लावून जाणारा अनुभवसुद्धा त्यांनी सांगितला. ‘2006 मध्ये वाशी नगरपालिकेमध्ये अतिक्रमण विभागात कार्यरत असताना जवळपास 1500 अतिक्रमण काढले आणि त्यावेळी मनाची घालमेल करणारा प्रसंग समोर आला. काय निर्णय घ्यावा हे कळत नव्हतं. पण तो प्रसंग माझ्यासाठी टर्निंग पॉईंट होता,’ असं ते म्हणाले. तो प्रसंग काय होता आणि त्यावेळी नेमकं काय घडलं ते कार्यक्रमात पाहायला मिळेल. हा भाग येत्या गुरुवारी आणि शुक्रवारी रात्री 9.30 वाजता प्रसारित होणार आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.