आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कार्यशैलीमुळे सर्वच शहरात वादग्रस्त ठरणारे तुकाराम मुंढेंची नाशिकहूनही बदली

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नाशिक - अापल्या कार्यशैलीमुळे सर्वच शहरात वादग्रस्त ठरणारे सनदी अधिकारी तुकाराम मुंढे यांची नाशिक मनपा अायुक्तपदावरुनही मुदतपूर्व बदली करण्यात अाली.  उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे हे अाता नाशिक मनपाचे नवे अायुक्त म्हणून सूत्रे स्वीकारतील. मुंढे यांची बदली नेमकी कुठे झाली याबाबत अधिकृत घाेषणा करण्यात अाली नसली तरी गमे यांच्या जागी त्यांना पाठवले जाण्याची शक्यता वर्तवली जात अाहे.

 

 नाशिक मनपात सत्ताधारी भाजप  विरुद्ध मुंढे असा संघर्ष काही दिवसांपासून सुरु हाेता. यातूनच अाॅगस्ट महिन्यात मुंढे यांच्याविराेधात अविश्वास ठरावाचे अस्त्र भाजप नगरसेवकांनी उपसले हाेते. मात्र मुख्यमंत्र्यांनी पक्षाच्या नेत्यांना समज देत हा ठराव मागे घ्यायला लावला हाेता.

बातम्या आणखी आहेत...