आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आजचे तूळ राशिफळ, 4 Dec 2018: जाणून घ्या, तुमच्यासाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आजचे तूळ राशिफळ (4 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya):

पॉझिटिव्ह - नोकरदारवर्ग रुटीन कामाशिवाय काही नवे करण्‍याचा प्रयत्न करू शकतो. बिझनेस वृद्धीच्या दृष्टीनेही प्रयत्न करू शकतात. भविष्यात निश्चितच त्याचा लाभ होऊ शकतो. नवे काम सुरु करण्‍याकडे तुमचा कल राहील. तुमच्या डोक्यात नवे विचार सारखे सुरु राहातील. परंतु तुम्हाला व्यावहारिक राहावे लागेल. चतुराईने काम करावे लागले. आर्थिक व्यवहार करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. नोकरीत बदल करण्याचाही ‍विचार डोक्यात येईल. प्रवासाचे योग आहेत. 


निगेटिव्ह - वायफळ खर्च करू नका. अवास्तव गोष्टीत जास्त  गुंतून पडू नका. दैनंदिन कामात खर्च वाढण्याची शक्यता आहे. एखादा वाद डोके वर काढेल. विचारपूर्वक वक्तव्य करा. आरोग्याबाबत सजग राहावे लागेल. दातांचा त्रास सुरु होण्याची शक्यता आहे.


काय करावे - बडी शोप किंवा माऊथ फ्रेशनरचा वापर करावा. 


लव्ह- तूळ राशीचे लोक जरा जास्तच भावूक असतात. जोडीदाराच्या भावना समजून घ्या. जोडीदाराचे मत जाणून घ्या. 


करिअ र- कार्यक्षेत्रात वाढ होईल. संयम राखावा लागेल. कोणताही निर्णय घेतात घाईगडबड करू नका. विद्यार्थ्यांसाठी उत्तम दिवस. मात्र, विद्यार्थ्यांना जास्त परिश्रम घ्यावे लागतील.


हेल्थ - डोकेदुखीची समस्या उद्‍भवू शकते. थकान जाणवेल. तोंडाचे आजार होण्याचा शक्यता.

बातम्या आणखी आहेत...