आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

5 Dec 2018, तूळ राशिफळ : जाणून घ्या, तूळ राशीच्या लोकांसाठी कसा राहील आजचा दिवस

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तूळ राशी, 5 Dec 2018, Aajche Tula Rashi Bhavishya:

पॉझिटिव्ह - आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे. कारण आज तुम्हाला बिझनेसमध्ये मोठा लाभ होण्याचे योग आहेत. शेअर मार्केट  किंवा दलालीचे काम करणार्‍यांना मोठा लाभ मिळू शकतो. दाम्पत्य जीवन सुखमय राहील. नवे वाहन खरेदी करण्याचा विचार मनात येईल. जुने वादही संपुष्ठात येतील. तुमच्या मधुर संवादाने बरीच कामे मार्गी लागतील. बिझनेसमध्ये व्यावहारिक राहावे लागेल. कामात सातत्य ठेवा. त्याचे फळ मिळत राहील. काही लोकांसोबत तुम्ही भावनात्मक नाते प्रस्थापित कराल.


निगेटिव्ह - आज प्रत्येक गोष्‍टीत तुमची कसोटी लागणार आहे. अप्रत्यक्ष तुमच्या मनावर दडपण निर्माण होईल. कोणालाही सल्ला देत बसू नका. विशेष म्हणजे कोणत्याही वादात‍ अडकू नका. त्यामुळे तुम्हालाच त्रास होईल. 


काय करावे - कोणालाही खोटे आश्वासन देऊ नका.
 

लव्ह - जास्तीत जास्त वेळ आपल्या जोडीदाराला द्याल. घरातील छोट्या-मोठ्या गोष्टींकडे आज तुम्हाला लक्ष द्यावे लागेल. आपल्या बोलण्यावर संयम ठेवावे लागेल. प्रेमीयुगुलांसाठी उत्तम दिवस. 


करिअर- नोकरदार आणि बिझनेस करणार्‍यांसाठी उत्तम दिवस. चुकीच्या ठिकाणी गुंतवणूक केल्याने नुकसान होण्याची शक्यता नाकारता येत नाही. विद्यार्थ्यांना यश मिळेल.


हेल्थ- थकवा आणि आळस जाणवेल.

बातम्या आणखी आहेत...