आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

तुळजापूरला शिस्त लावून जिल्हाधिकारी गमे निघाले नाशिकला

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

उस्मानाबाद- अनेक अधिकाऱ्यांना शक्य झाले नाही, असे ऐतिहासिक निर्णय घेऊन तुळजापूरच्या तुळजाभवानी मंदिरात शिस्त निर्माण केलेले उस्मानाबादचे जिल्हाधिकारी राधाकृष्ण गमे यांची नाशिकला महापालिका आयुक्तपदी बदली झाली आहे. केवळ १९ महिन्यात अत्यंत महत्त्वाचे निर्णय घेत कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून गमे यांची ख्याती झाली होती.आता जिल्ह्याची धुरा कोणाकडे जाणार, याकडे लक्ष लागले आहे.


राधाकृष्ण गमे यांची नाशिकच्या पालिका आयुक्तपदी बुधवारी (दि.२१) बदली झाली. गमे यांनी ३ मे २०१७ रोजी उस्मानाबादच्या जिल्हाधिकारीपदाचा कार्यभार घेतला होता. तुळजाभवानी मातेच्या मंदिरात शिर्डीच्या धर्तीवर अॅक्सेस कार्डद्वारे दर्शन घेण्याचा नियम गमे यांनी घेतला. त्यानंतर व्हीआयपी दर्शन बंद करून भाविकांना सशुल्क दर्शनाची ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण व्यवस्था गमे यांनी लावली. स्वत:च्या कुटंुबालाही व्हीआयपी दर्शनाचा लाभ न देता सशुल्क दर्शनातून शिस्त घालून दिली.

 

कायम दुष्काळग्रस्त म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातील शेतकऱ्यांसह सामान्य नागरिकांच्या कल्याणकारी योजनांच्या अंमलबजावणीसाठी गमे यांचा कटाक्ष होता. कुठल्याही फाईल्स पेंडिंग न ठेवणे, हे त्यांच्या कामाचे वैशिष्ट्य होते. प्रसिध्दीपासून कायम दूर राहीलेल्या गमे यांना गेल्या काही महिन्यापूर्वी पदाेन्नती मिळाली होती. नाशिकसारख्या महानगरात पालिकेच्या आयुक्तपदी त्यांना पदोन्नती मिळाली असली तरी उस्मानाबादला जिल्हाधिकारी कोण, याचे उत्तर अद्याप मिळालेले नाही.


मुंढेंच्या बदलीच्या चर्चेने जिल्ह्यात दाणादाण
जिल्हाधिकारी राधकृष्ण गमे यांची नाशिकला तर त्यांच्याजागी नाशिक महापालिकेचे आयुक्त तुकाराम मंुढे यांची उस्मानाबादला जिल्हाधिकारपदावर बदली झाल्याची चर्चा सोशल मीडियातून रंगली होती. मुंढे यांच्या बदलीच्या चर्चेचे पेव फुटल्यानंतर त्यांच्या कार्यपध्दतीमुळे भ्रष्टाचाऱ्यांना लगाम बसेल, अनेक रेंगाळलेली प्रकरणे धसाला लागतील, अशा अनेक प्रकारच्या चर्चा सुरू होत्या. मात्र, मुंढेंच्या बदलीबाबत अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.वास्तविक, मुंढ यांना जिल्हाधिकारीपदावरून यापूर्वीच पदोन्नती मिळाल्याने आता त्यांना एखाद्या लहान जिल्ह्याचे जिल्हाधिकारीपद देण्याची शक्यता कमीच आहे. मात्र, तसे झाल्यास मुंढे यंाचे खच्चीकरण मानले जाईल.

 

बातम्या आणखी आहेत...