आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवणार पहिल्या हिंदू खासदार, पुढील आठवड्यात अधिकृत घोषणा

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

वॉशिंगटन - अमेरिकेतील पहिल्या हिंदू खासदार तुलसी गबार्ड 2020 ची राष्ट्राध्यक्ष निवडणूक लढवणार आहेत. त्यांनी आपला पक्ष डेमोक्रेटिककडून उमेदवारी मिळवण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे. तुलसी गबार्ड यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा पुढील आठवड्यात होणार अशी शक्यता आहे. डेमोक्रेटिक पक्षाच्या अधिकृत उमेदवार होण्यासाठी तुलसी गबार्ड यांना प्रायमरी इलेक्शनमध्ये निवडून यावे लागेल. तुलसी 2013 पासून अमेरिकेत हवाई येथून डेमोक्रेटिक पक्षाच्या खासदार आहेत.


युद्ध आणि शांतता सर्वात मोठा मुद्दा
तुलसी गबार्ड यांनी एका माध्यमाशी संवाद साधताना राष्ट्राध्यक्ष निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. अमेरिकेतील नागरिकांसमोर अनेक समस्या आहेत. त्यांच्याविषयी आपल्याला चिंता असून त्यांचीच मदत करण्यासाठी ही निवडणूक लढवत आहे. सोबतच, या निवडणुकीत युद्ध आणि शांतता हेच सर्वात मोठे मुद्दे असतील असे त्यांनी सांगितले आहे. सर्व काही सुरळीत राहिल्यास तुलसी अमेरिकेतील मोठ्या राजकीय पक्षाकडून अधिकृत उमेदवारी दाखल करणाऱ्या पहिल्या हिंदू नेत्या ठरू शकतात. सोबतच, निवडणुकीत विजयी झाल्यास अमेरिकेच्या पहिल्या महिला राष्ट्राध्यक्ष आणि सर्वात युवा अमेरिकन राष्ट्राध्यक्ष ठरतील.


कॅथोलिक कुटुंबात झाला जन्म
गबार्ड यांतचा जन्म अमेरिकेतील समोआ येथे एका कॅथोलिक कुटुंबात झाला होता. त्यांच्या आई कॉकेशियन हिंदू आहेत. त्यामुळे, तुलसी यांनी देखील हिंदू धर्म स्वीकारला. खासदार झाल्यानंतर भगवत गीतावरून शपथ घेणाऱ्या त्या अमेरिकेतील पहिल्याच नेत्या ठरल्या होत्या. तुलसी संसदेच्या सशस्त्र सेवा समितीसह परराष्ट्र संबंधांवरील समितीच्या सदस्य आहेत. एकूणच चार वेळा खासदार झालेल्या तुलसी यांचे मोठे समर्थक आहेत.

बातम्या आणखी आहेत...