आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National
  • Tulsi Kumar Son Shivaay First Birthday Grand Party Celebration: After Gulshan Kumar Death His Son Bhushan Handling T Series Company

एक वर्षाचा झाला गुलशन कुमार यांचा नातू, मुलगी तुलसी कुमारने ठेवले होते बर्थडेचे ग्रॅण्ड सेलिब्रेशन, वेन्यूवर सर्वत्र ठेवली होती खेळणी : PHOTOS

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः प्रसिद्ध गायिक आणि टी-सीरीज कंपनीचे मालक दिवंगत गुलशन कुमार यांचा नातू अर्थातच तुलसी कुमारचा मुलगा शिवाय एक वर्षांचा झाला आहे. तुलसीने मुलाच्या वाढदिवसाच्या निमित्ताने एका ग्रॅण्ड पार्टीचे आयोजन केले होते. पार्टीचे निवडक फोटो तुलसीने तिच्या सोशल मीडियावर शेअर केले आहेत. मुलासोबतचे फोटो शेअर करुन तुलसीने त्याला कॅप्शन दिले, "तेरा मुझसे है पहले का नाता कोई, यूं ही नहीं दिल लुभाता कोई, जाने तू या जाने ना..." पती हितेश आणि भाऊ भूषण कुमार यांच्यासोबतचेही फोटो तुलसीने शेअर केले आहेत. भावासोबतचा फोटो शेअर करुन तुलसीने कॅप्शन लिहिले, "फूलों का तारों का सबका कहना है, एक करोडो में मेरे भैया हैं." वडिलांप्रमाणेच तुलसीसुद्धा बॉलिवूडची प्रसिद्ध गायिका आहे. तिने गेल्यावर्षी म्हणजे 2017 मध्ये मुलाला जन्म दिला होता.


जयपूरच्या बिझनेसमनसोबत झाले आहे तुलसीचे लग्न... 
- दिल्लीतील लेडी श्रीराम कॉलेजमधून पदवीपर्यंतचे शिक्षण घेणा-या तुलसीचे पती हितेश रल्हान हे जयपूर येथील एक मोठे बिझनेसमन आहेत. त्यांचा गार्मेंट आणि फर्निचर एक्सपोर्टचा बिझनेस आहे.
- हितेश आणि तुलसीची भेट एका कॉमन फ्रेंडच्या माध्यमातून झाली होती. त्यानंतर कुटुंबीयांच्या परवानगीने दोघांनी 2014 मध्ये साखरपुडा आणि 22 फेब्रुवारी 2015 रोजी लग्न केले होते.

 

ही आहे तुलसीची फॅमिली... 
- वडील गुलशन कुमार यांच्या निधनानंतर तुलसीचा थोरला भाऊ भूषण कुमारने T-Series कंपनीची धुरा सांभाळली. तर तुलसीने गायन क्षेत्रात करिअर केले.
- T-series ही भारतातील सर्वात मोठ्या म्युझिक कंपनींपैकी एक असून ती 200 मिलियन डॉलर (सुमारे 1420 कोटी) ची कंपनी बनली आहे.
 - तुलसी कुमारचा अजून एक बहीण असून तिेच नाव खुशाली कुमार आहे. खुशाली मॉडेल आणि डिझायनर आहे. 
- गुलशन कुमार यांचा मुलगा भूषण कुमार हा निर्माता आहे. तर अभिनेत्री-निर्माती आणि दिग्दर्शिका दिव्या खोसला ही भूषण कुमारची पत्नी आहे. या जोडप्याला एक मुलगा आहे.

'चुप-चुप के' फिल्ममधून केले होते सिंगिंग डेब्यू...
- तुलसीने 'चुप-चुप के' फिल्ममधून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. त्यानंतर तिने 'हमको दीवाना कर गए' आणि 'अक्सर' या चित्रपटांसाठी पार्श्वगायन केले. तिने हिमेश रेशमिया, प्रीतम आणि साजिद-वाजिद या संगीतकारांसोबत काम केले आहे. 


तुलसी कुमारने गायलेली गाणी...
- मोहब्बत की गुजारिश... (अक्सर)
- हमको दीवाना कर गए... (हमको दीवाना कर गए)
- तेरी याद बिछाके सोता हूं... (रॉकी)
- तेरे बिन चैन न आवे... (कर्ज)
- तुम जो आए जिंदगी में बात बन गई... (वन्स अपॉन ए टाइम इन मुंबई)
- तू ही रब तू ही दुआ... (डेंजरस इश्क)
- सांसों ने बांधी है डोर पिया... (दबंग-2)
- मेरे यारा तेरे गम अगर पाएंगे... (आशिकी-2)
- मुझे इश्क से... (यारियां)
- कुछ तो हुआ है... (सिंघम रिटर्न)
- तू है कि नहीं... (रॉय)
- सोच ना सके... (एयरलिफ्ट)
- इश्क दी लत तड़पावे... (जुनूनियत)

 

बातम्या आणखी आहेत...