जगातील पहिला AC...पलंगावर रूम तयार करून करता येतो फीट, लॅम्प आणि मोबाइल चार्ज पोर्टसारखे दिलेत फीचर्स

दिव्य मराठी वेब टीम

Apr 06,2019 12:51:00 PM IST


गॅझेट डेस्क - टूपिक (Tupik)कंपनी एक विशेष प्रकारचा एसी तयार करते. यासाठी एका विशिष्ट प्रकारची खोली तयार करण्याची आवश्यकता आहे. ही रूम कंपनी AC सोबतच देते. कंपनी जो एसी देते त्यासोबतच पलंगावर तयार होणारी रूम देखील देते. रॉडच्या मदतीने ही रूम बेडवर तयार करण्यात येते. सिंगल आणि डबल दोन्ही बेडसाठी हा एसी वेगवेगळा असतो. पलंगावर लावण्यात येणाऱ्या मच्छरदानीप्रमाणे ही एसी रूम तयार करावी लागते. बेडवर लावण्यात येणारा हा जगातील पहिलाच एसी आहे.


खिडकीत फिट होतो एसी

> बेडवरील ही रूम तयार झाल्यानंतर त्याच्या दोन बाजूला उतरण्यासाठी दरवाजे आहेत. तर समोरील बाजूस खिडकी देण्यात आली आहे. या खिडकीतच एसी बसवण्यात येतो.

> एसीमध्ये नाइट लॅम्प, मोबाइल चार्ज पोर्टसारखे फीचर्स देण्यात आले आहेत. सोबतच एसी स्वींगचे ऑप्शन देखील मिळते.

> सिंगल बेड AC ची किंमत 17,990 रूपये आणि डबल ची 19,990 रूपये आहे.

X
COMMENT