आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App
  • Marathi News
  • Turkestan : Istanbul Airport Collapses On Plane's Runway, Three Pieces Broken

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

171 प्रवाशांसह लँडिंग करताना विमानाचे झाले तीन तुकडे, धावपट्टीवरून घसरल्याने झाला भीषण अपघात

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक
  • अपघात घडताच विमानाला लागली आग; एका प्रवाशाचा मृत्यू, 150 पेक्षा अधिक जखमी
  • जोरदार वारा आणि मुसळधार पावसात लँडिंग करण्याचा करत होते प्रयत्न

इस्तांबुल - तुर्कीतील इस्तांबुल येथे एका विमानाचे लँडिंग वेळी घसरल्याने तीन तीन तुकडे झाले. यादरम्यान विमानाच्या मागील भागास आग लागली होती. या अपघातात एका व्यक्तीचा मृत्यू झाला तर 150 हून अधिक जखमी झाले आहेत. बोइंग 737 चे हे विमान जोरदार वारा आणि मुसळधार पावसात लँडिंग करण्याचा प्रयत्न करत होते. अपघातानंतर विमानाला लागली होती आग 


विमानात 171 प्रवासी आणि 6 क्रू मेंबर होते. मिळालेल्या माहितीनुसार, विमान इजमिर शहराकडून इस्तांबुलच्या सबिहा गोजेन विमानतळावर उतरताना हा अपघात घडला. यानंतर आपत्कालीन टीमने घटनास्थळी धाव घेत आग विझवली. घटनेनंतर समोर आलेल्या फोटोत काही लोक विमानाच्या पाठीमागील बाजूतून बाहेर पडताना दिसत आहेत. 

विमानात होते 20 परदेशी नागरिक


माहितीनुसार, विमानाच्या अपघातानंतर विमानतळ बंद करण्यात आले आहे. इतर विमानांचे उड्डाणे दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली आहेत. स्थानिक मीडियाने सांगितले की, विमानात बहुतांश तुर्की लोक होते. तर 20 परदेशी नागरिकांचा सहभाग होता. इस्तांबुलचे गर्व्हनर अली येरलीकाया यांनी सांगितले की, पेगासस एअरलाइन्सचे विमान खराब हवामानामुळे धावपट्टीवरून अंदाजे 50-60 मीटरपर्यंत घसरले. 

जखमींमध्ये एका दक्षिण कोरियन नागरिकाचा समावेश


आरोग्य मंत्री फहार्टिन कोजा यांनी एका तुर्की नागरिकाचा मृत्यू झाल्याची पुष्टी केली आहे. परिवहन मंत्री मेहमत जाहित तुरहान यांनी सांगितले की, जखमींमध्ये एका दक्षिण कोरियाच्या नागरिकाचा समावेश आहे. दरम्यान इस्तांबुलच्या सरकारी अधिकाऱ्यांनी दुर्घटनेची चौकशीला सुरवात केली आहे.