आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

फक्त त्वचेसाठी नाही तर कॅन्सरवरही प्रभावी ठरते हळद

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

हळद, हरिद्रा, कांचनी, पीता, अरशीन आदी नावाने ओळखली जाणारी औषधी वनस्पती आपल्या परिचयाची आहे. प्राचीन काळापासून हळदीचा वापर भारतीय लोक जेवणात करतात. हळदीमुळे जेवण स्‍वादिष्‍ट तर बनतेच त्‍याशिवाय आरोग्‍यासाठीही ते लाभदायक असते. आयुर्वेदात तर हळदीला अमृत तुल्य औषधी मानण्यात आले आहे. सुंदरतेच्या बाबतीतही हळद गुणकारी आहे आणि सौंदर्याच्या अनेक समस्या दूर करण्यात सक्षमही आहे.

  • गुणकारी -

- हळदीत आढळून येणारा करक्युमिन नावाचा घटक याला पिवळ रंग देतो. तो कलरिंग एजंटप्रमाणे काम करून त्वचेचा रंग खुलवतो. - अँटिसेप्टिकशिवाय हळदीत अँटीबॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे हळद त्वचेसाठी उपयुक्त आहे. - हळद अँटिऑक्सीडंटचे काम करते. त्वचादेखील तरुण राहते. त्याचबरोबर त्वचेवरील सुरकुत्या किंवा इतर समस्यांपासूनही बचाव होतो.

  • मृत पेशी -

त्वचेच्या मृत पेशी दूर करण्यासाठीदेखील हळद खूप उपयुक्त आहे. बेसनामध्ये हळद मिसळून पाण्याद्वारे याची पेस्ट तयार करा. अंघोळ करताना संपूर्ण शरीराला लावून हातांनी मालिश करा. दररोज असे केल्याने मृत पेशी दूर होतील आणि त्वचा चमकदार दिसेल.

  • कॅन्सर -

जर तुम्हाला कॅन्सरपासून नेहमीसाठी दूर राहायचे असेल तर जेवणात हळदीचा जास्त वापर करा. अमेरिकन रिसर्चनुसार हळदीमध्ये करक्यूमिन नावाचे तत्व आढळून येते. या तत्वामुळे कॅन्सर कोशिका नष्ट होतात आणि शरीराचा कॅन्सरपासून बचाव होण्यास मदत होते.

  • मुरूम -

हळदीत चंदन पावडर मिसळून पाण्याने पेस्ट तयार करा व चेहर्‍यावर लावा. 10 मिनिटांनी चेहरा धुवून घ्या. चेहर्‍यावरील मुरूम, पुरळ घालवायचे असतील तर हळदीत मोहरीचे तेल आणि लिंबाचा रस टाकून थेट मुरुमांवर लावा. 15 मिनिटांनंतर हलक्या हातांनी स्क्रब करा. नंतर साध्या पाण्याने धुवून घ्या. आठवड्यातून तीन वेळा स्क्रब करा.

  • मधुमेह -

मधुमेही रूग्‍णांसाठी हळद हे औषधापेक्षाही जास्‍त गुणकारक आहे. मधुमेह असणा-या लोकांनी दररोज गरम दूधात हळद टाकून दूध प्‍यावे. हळदीमध्‍ये वातनाशक गुण असल्‍यामुळे मधुमेहाची समस्‍या असणा-यांना याचा चांगलाच फायदा होतो. आवळ्याचा रस, हळद आणि मध एकत्र करून पिल्याने मधुमेहाच्या रुग्णाला आराम मिळू शकतो.

  • टाचांच्या भेगा :

टाचांच्या भेगा बुजवण्यासाठी हळद रामबाण आहे. तीन चमचे हळदीत खोबरेल तेल टाकून लेप तयार करावा. तो अंघोळ करण्याच्या 10 मिनिटे आधी टाचांच्या भेगांवर लावावा. एक दिवसआड हळदीत खोबरेल तेलाऐवजी एरंडीचे तेल मिसळून लेप लावावा. हळद हिलिंग एजंटचे काम करेल आणि भेगा लवकर बुजतील.

  • सर्दी-खोकला -

सर्दी-खोकला झाल्‍यास दूधात हळद घालून पिण्‍यास सांगितले जाते. अद्रक आणि एक चमचा हळदीच्या रसात मध मिसळून पिल्याने सर्दी-खोकला बरा होण्यास मदत मिळते.

  • सुरकुत्या :

जर डोळ्यांच्या आसपास रेघा दिसत असतील तर ताकात हळद मिसळून डोळ्यांच्या आसपास लावून 20 मिनिटे ठेवावे. नंतर थंड पाण्याने धुवून घ्यावे. नियमितपणे असे केल्यास रेघा फिक्या पडायला लागतील.

  • जखम भरण्यासाठी -

दुधात हळद मिसळून दूध देण्याचीही आपल्याकडे प्रथा आहे. असे केल्याने जखम भरून यायला मदत होते. हळदीचा लेप दिल्याने वेगाने जखम भरून येते.

बातम्या आणखी आहेत...