Home | Jeevan Mantra | Arogya/Ayurved | turmeric health benefits in marathi

हळदीचे 10 फॉर्म्युले : चिमुटभर हळदीने नष्ट होतील विविध आजार

हेल्थ डेस्क | Update - Aug 04, 2018, 04:33 PM IST

चार हजार वर्षांपूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कर्क्युमिनसारखे अनेक आैषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बच

 • turmeric health benefits in marathi

  चार हजार वर्षांपूर्वीपासून हळदीचा वापर केला जात आहे. यामधील कर्क्युमिनसारखे अनेक आैषधी गुणधर्म गंभीर आजारांपासून आपला बचाव करतात. हळदीला दुसऱ्या आैषधी पदार्थांमध्ये मिसळून वापरल्यास त्याचे अनेक फायदे होतात...

  1. मजबूत हाडे
  अर्धा चमचा हळद अर्धा ग्लास कोमट दुधामध्ये मिसळून झोपण्यापूर्वी प्यायल्याने हाडे मजबूत होतात.


  2. मजबूत हिरड्या
  अर्धा चमचा हळद, चिमुटभर मीठ आणि एक चमचा मोहरीचे तेल मिसळून हिरड्यांची मालिश करा.


  3. चमकदार दात
  अर्धा चमचा हळदीमध्ये अर्धा चमचा खातासोडा मिसळून दात घासल्याने दात चमकतात.


  4. सर्दी-पडसे, ताप
  एक चमचा शुद्ध तुपामध्ये अर्धा चमचा हळद भाजून घ्या. हे मिश्रण मधामध्ये मिसळून खा.


  5. जखम
  जखमेवर अर्धा चमचा भाजलेली हळद आणि मध लावल्याने हे अँटिबॅक्टेरियलचे काम करते.


  6. जखम
  अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा चुना एक चमचा मधामध्ये मिसळून लावा. हळदीचे दूध नियमित प्या.


  7. घशात वेदना
  एक ग्लास कोमट पाण्यात अर्धा चमचा हळद आणि चिमुटभर मीठ मिसळून गुळण्या करा. हळदीचे दूध प्या.


  8. त्वचारोग
  एक चमचा खोबरेल तेलात अर्धा चमचा हळद मिसळून त्वचारोगावर नियमित लावा.


  पुढील स्लाईड्सवर जाणून घ्या, इतर दोन उपाय...

 • turmeric health benefits in marathi

  9. सांधेदुखी 
  अर्धा चमचा हळदीमध्ये दोन चमचे अद्रकचा रस मिसळून गरम करा. हे वेदनेच्या ठिकाणी लावा. 

 • turmeric health benefits in marathi

  10. खोकला : अर्धा चमचा हळदमध्ये पाच मिरे बारीक करून मिसळा. हे कोमट दुधासोबत घ्या. मधसुद्धा घेऊ शकतात. 

Trending