आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दूध, हळद, आले आणि तुळस खोकल्यासाठी लाभदायी

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

या ऋतुमध्ये सर्दी-खोकल्याचा त्रास वाढतो. तुम्हीदेखील यामुळे त्रस्त असाल तर या घरगुती उपायांचा अवश्य अवलंब करा.
1. दूध आणि हळद
गरम पाणी किंवा गरम दुधात एक चमचा हळद टाकून पिल्याने सर्दी-खोकल्यामध्ये आराम मिळतो. हा उपाय लहान मुलांसाठीही फायद्याचा आहे. हळदीत अँटिव्हायरल आणि अँटिबॅक्टेरियल गुण असतात. यामुळे सर्दी-खोकल्यापासून आराम मिळतो.

2. आल्याचा चहा
आले उष्ण असते. त्यामुळे ते सर्दी-खोकल्याचा प्रभाव कमी करण्यात फायद्याचे ठरते. यासाठी आले किसून बारीक करा. त्यात एक कप गरम पाणी किंवा दूध मिसळा. काही वेळ हे उकळून घेतल्यानंतर प्या. दुधाच्या चहामध्ये आले टाकून पिणेदेखील फायद्याचे आहे.

3. लिंबू आणि मध
लिंबू आणि मधाच्या वापराने सर्दी-खोकला बरा होतो. यासाठी एक ग्लास कोमट पाण्यात मध आणि लिंबाचा रस मिसळून प्या. आल्याच्या रसासोबत मधाचे सेवन केल्यानेही सर्दी-खोकल्याचा प्रभाव बऱ्याच अंशी कम व्हायला लागतो.

4.लसूण
यामधील अॅलिसिन अँटिबॅक्टेरियल, अँटिव्हायरल आणि अँटिफंगल गुणांनी युक्त असते. लसणाच्या पाच पाकळ्या तुपामध्ये भाजून खा. असे एक-दोनदा केल्याने सर्दी बरी होते. उपाशी पोटी भाजलेल्या लसणाच्या पाकळ्या खाणेदेखील फायद्याचे आहे.

5. तुळशीची पाने
एक कप गरम पाण्यात तुळशीची पाच-सात पाने टाका. त्यामध्ये आल्याचा एक तुकडा मिसळा. हे काहीवेळ उकळून घ्या आणि त्याचा काढा तयार करा. पाणी अर्धे राहिले तेव्हा ते कोमट करून प्या. तुळशीचा चहादेखील सर्दी-खोकल्यामध्ये गुणकारी आहे.

बातम्या आणखी आहेत...