आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

एकाच स्पर्धेत दाेन पदकांनी केला विक्रम; विद्यापीठाला मिळवून दिले दुसरे सुवर्ण

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

औरंगाबाद- औरंगाबादच्या युवा तलवारबाजीपटू तुषार आहेरने गुरुवारी विक्रमी यशाचा पल्ला गाठला. त्याने अमृतसर येथील अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत दाेन पदकांची कमाई केली. त्याने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला या स्पर्धेत प्रत्येकी एक सुवर्ण आणि राैप्यपदक मिळवून दिले. त्याने या स्पर्धेत फाॅइलमध्ये सुवर्ण ाणि इप्पी प्रकारात राैप्यपदकाची कमाई केली आहे. 

 

विद्यापीठाला ८ वर्षांनंतर सुवर्ण :

तुषारने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ संघाला तब्बल ८ वर्षानंतर अखिल भारतीय तलवारबाजी स्पर्धेत साेनेरी यश मिळवून दिले. त्याने वैयक्तिक फाॅइल प्रकारात सुवर्णपदकाची कमाई केली. यापूर्वी २०११ मध्ये जम्मू-काश्मीर येथील ऑल इंडिया स्पर्धेच्या सांघिक गटात विद्यापीठ संघाने सुवर्णपदक जिंकले हाेते. 

 

दाेन पदके जिंकणारा पहिला :

अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत तुषार आहेरने प्रत्येकी एका सुवर्ण आणि राैप्यपदकाची कमाई केली. त्याने अनुक्रमे फाॅइल आणि इप्पी प्रकारामध्ये हे यश संपादन केले. अशी कामगिरी करणारा ताे विद्यापीठाचा पहिला तलवारबाजीपटू ठरला. त्याने अमृतसर येथील ऑल इंडिया स्पर्धेत हा पराक्रम गाजवला. 

 

तुषारचे यश विद्यापीठासाठी ऐतिहासिक यश; जिंकली दाेन पदके 
तुषार आहेरच्या रुपाने डाॅ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या नावे ऐतिहासिक यशाची नाेंद झाली. त्याने अखिल भारतीय आंतर विद्यापीठ तलवारबाजी स्पर्धेत विद्यापीठ संघासाठी सुवर्णपदक जिंकले. त्याने पुरुषांच्या फाॅइल प्रकारामध्ये सुवर्णपदकाची कमाई केली. त्यापाठाेपाठ याच स्पर्धेत त्याने इप्पी प्रकारातही चॅम्पियन हाेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याला या गटात राैप्यपदकावर समाधान मानावे लागले. 

बातम्या आणखी आहेत...