आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वर्षातून एखाद-दुस-या चित्रपटात दिसतो एकता कपूरचा भाऊ, पण तरीदेखील आहे कोट्यवधीच्या प्रॉपर्टीचा मालक, 4.5 कोटींच्या तर फक्त कार आहेत

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः ड्रामा क्वीन एकता कपूरचा भाऊ तुषार कपूर यावर्षी मोठ्या पडद्यावर एकाही चित्रपटात झळकला नाही. गेल्यावर्षी तो गोलमाल अगेन या चित्रपटात दिसला होता. 42 वर्षीय तुषारने करिअरची सुरुवात 2001 मध्ये करीना कपूरच्या अपोझिट 'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून केली होती. पहिल्याच चित्रपटातील भूमिकेसाठी तुषारला सर्वोत्कृष्ट पदार्पणाचा फिल्मफेअर अवॉर्ड मिळाला होता. पण त्यानंतर त्याच्या करिअरला जणू उतरती कळा लागली. त्याचे आलेले सर्व चित्रपट तिकिट खिडकीवर सपशेल आपटले. तुषार आता वर्षातून एखाद दुस-या चित्रपटातच झळकताना दिसतोय. 


चित्रपटात अपयशी ठरल्यांतरही आहे कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक... 

तुषार कपूरला चित्रपटात हवे तसे यश मिळाले नाही, पण तरीदेखील तो कोट्यवधींच्या प्रॉपर्टीचा मालक आहे. वेबसाइट finapp.co.in च्या रिपोर्टनुसार, तुषारजवळ सुमारे 11 मिलियन डॉलर (जवळजवळ 80 कोटी रुपये) ची प्रॉपर्टी आहे. तुषारची वार्षिक कमाई 6.40 लाख डॉलर (4.67 कोटी रुपये) आहे. याशिवाय त्याच्याजवळ 35 कोटींची खासगी गुंतवणूक आहे. 

 

4.5 कोटींच्या लग्झरी गाड्यांमधून फिरतो तुषार...
तुषारला कारची विशेष आवड आहे. त्याच्या कलेक्शनमध्ये मर्सडीज बेंज, रेंज रोवर, बेंटले आणि फोर्ड या लग्झरी कंपन्यांच्या 4 कार आहेत. या सर्व कारची किंमत साडे चार कोटींच्या घरात आहे. याशिवाय तुषारजवळ मुंबईत रिअल स्टेट प्रॉपर्टीदेखील आहे. 2013 मध्ये त्याने एक घर खरेदी केले असून त्याची किंमत 7 कोटींच्या घरात आहे.

 

लग्नाविनाच एका मुलाचा पिता आहे तुषार...
जून, 2016 मध्ये तुषार कपूर लग्नाविनाच पिता झाला. त्याचा मुलगा लक्षचा जन्म मुंबईतील जसलोक हॉस्पिटलमध्ये झाला. सिंगल पेरेंट बनलेल्या तुषारच्या मुलाचा जन्म सरोगसीच्या माध्यमातून झाला. तुषार म्हणाला होता की, बॉलिवूड कमिटमेंट्स बिझी असल्याने तो पत्नीला वेळ देऊ शकणार नाही, त्यामुळे त्याने लग्नाविनाच वडील होण्याचा निर्णय घेतला.

 

करिअरमध्ये करावा लागला वाईट काळाचा सामना... 
करिअरमध्ये एकानंतर एक आलेल्या फ्लॉप चित्रपटांमुळे तुषारला होम प्रॉडक्शनशिवाय दुस-या प्रॉडक्शनचे चित्रपट मिळणे बंद झाले होते. तुषारने त्याच्या होम प्रॉडक्शनच्या 7 चित्रपटांमध्ये काम केले. या स्टार पुत्र आणि स्टार भावाला यश मिळवण्यासाठी, स्वतःला सिद्ध करण्यासाठी कठोर मेहनत करावी लागली. सोलो भूमिका त्याला मिळत नाही. पण छोट्या छोट्या भूमिकांसाठीही त्याला संघर्ष करावा लागतोय. त्याच्या हातात सध्या एकही चित्रपट नाही.

 

स्वबळावर देऊ शकला नाही एकही हिट चित्रपट... 
'मुझे कुछ कहना है' या चित्रपटातून डेब्यू करणा-या तुषारचा पहिला चित्रपट अॅव्हरेज ठरला होता. त्याच्यासोबत करीना कपूर आणि रिंकी खन्ना होत्या. त्यानंतर तुषारने 'गायब' (2004), 'खाकी' (2004), 'क्या कूल है हम' (2005), 'क्या सुपर कूल है हम' (2012) सह अन्य काही चित्रपटांमध्ये काम केले. दिग्दर्शक रोहित शेट्टीच्या 'गोलमाल' सीरिजमध्ये त्याने काम केले. या सीरिजचे सर्व चित्रपट हिट ठरले. हे सर्व चित्रपट मल्टीस्टारर होते. 

बातम्या आणखी आहेत...