आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐन थंडीत टेंपरेचर वाढवायला येतेय राणादाची 'नंदिता वहिनी', आता स्टेज गाजिवनार!

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील ‘तुझ्यात जीव रंगला’ मालिकेत गायकवाड घराण्याची धाकटी सून नंदिता वहिनीची व्यक्तिरेखा साकारणारी धनश्री काडगांवकर अल्पावधीत घराघरात प्रसिद्ध झाली. राणा आणि अंजलीच्या प्रेमात नेहमी अडथळा आणणारी ही नंदिता वहिनी म्हणजेच धनश्री काडगांवकर हीने सगळ्यांचे विशेष लक्ष वळवून घेतले. तिने या मालिकेत अभिनयाबरोबरच तिच्या सौंदर्यानेही प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या या मालिकेतील तिचा ट्रॅक संपला असला तरी ती आता एका नव्या रूपात झी युवावर येणाऱ्या सेलिब्रिटी डान्स रिऍलिटी शो मध्ये झळकणार आहे. 

'युवा डान्सिंग क्वीन' बद्दल विचारले असता धनश्रीने सांगितले,"एक्सप्रेशन देणं हा माझा विशेष गुण आहे. लोकनृत्य मी केलं आहे पण वेस्टर्न डान्स मी जराही नाही केलय. आधी मला डान्स करायला खूप आवडायचं, मी भरतनाट्यम सुद्धा शिकलेली आहे.  पण माझी मालिका व इतर गोष्टीमुळे मला अजिबातच डान्स करायला मिळाला नाही. बऱ्याच वर्षात मी डान्स केलेला नाही आणि त्यामुळे मला एवढ्या मोठ्या प्लॅटफॉर्म वर डान्स करायची खरं तर भीती वाटतेय. पण पुन्हा एकदा प्रत्येक आर्टिस्टला तो झोन ब्रेक करण गरजेचं आहे. त्यामुळे झी युवा ने ही मला मोठी संधी दिली आहे त्यासाठी मी नक्कीच भरपूर मेहनत घेईन.' 

धनश्री काडगांवकर या अभिनेत्रीने नंदिता वहिनी हे पात्र एवढे उत्तम रंगवले की लोकांना त्या पात्राचा राग येऊ लागला. अर्थात हीच तिच्या कामाची पोचपावती आहे. मात्र या मालिकेतील तिचा लुक हा अगदीच घरेलू होता. फक्त साडी,केसांना तेल अश्या रूपातील धनश्री आता मात्र पूर्णपणे स्वतःचा मेकओव्हरकरून एका वेगळ्याच रूपात  युवा डान्सिंग क्वीन या कार्यक्रमातून प्रेक्षकांना दिसणार आहे . सौंदर्य आणि नृत्य या दोन्हीं कलांनी धनश्री खऱ्या अर्थाने आता 'युवा डान्सिंग क्वीन' चा स्टेज गाजिवनार. या कार्यक्रमात तिच्याबरोबर नावाजलेल्या अनेक सेलेब्रिटी डान्सर पहायला मिळतील आणि त्यांच्यात एक जंगी चुरस सुद्धा रंगेल. सौंदर्य आणि अदाकारी ने ठासून भरलेल्या या सौंदर्यवती जेव्हा 'युवा डान्सिंग क्वीन' च्या रंगमंचावर थिरकणार त्यामुळे आता ऐन थंडीत रंग चढणार, महाराष्ट्राचं टेंपरेचर वाढणार. या कार्यक्रमाचा सूत्रसंचालक अद्वैत दादरकर असून 'हिरकणी' फेम प्रसिद्ध अभिनेत्री सोनाली कुलकर्णी आणि प्रसिद्ध नृत्य दिग्दर्शक मयूर वैद्य या सेलिब्रिटी डान्सिंग रिऍलिटी शो चे परीक्षण करणार आहेत.