आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'तुझ्यात जीव रंगला'च्या राणादाच्या भावाचे खासगी आयुष्यात झाले दोनाचे चार हात, हरियाणवी कुडीसोबत घेतल्या सप्तपदी

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्कः छोट्या पडद्यावरील गाजत असलेल्या तुझ्यात जीव रंगला या मालिकेत सनी दाचे पात्र साकारणारा अभिनेता राज हंचनाळे लग्नाच्या बेडीत अडकला आहे. राजने इन्स्टाग्रामवर लग्नाचा फोटो शेअर आपल्या चाहत्यांना ही आनंदाची बातमी दिली. मौली हे राजच्या पत्नीचे नाव असून लग्नापूर्वी दोघे सहा वर्षे रिलेशनशिपमध्ये होते.

राजने लग्नाचा खास फोटो शेअर केला आहे. त्यात मौली आणि राजच्या हातात दोन पाट्या दिसत आहे. मौलीच्या हातात जी पाटी आहे, त्यावर दोस्तीचं प्रेम 2013 तर राजच्या हातात असलेल्या पाटीवर लग्नाचं प्रेम 2019 असा उल्लेख आहे. 2013 पासून हे दोघे एकमेकांना ओळखतात.  राजने लग्नाचा हा खास फोटो शेअर करुन त्याला #RajKiMolly #2states #maratha #jatni #maharashtra #harayana #love #friends असे हॅशटॅग दिले आहे. यावरुन राजची पत्नी मौली ही हरियाणाची असल्याचे समजते. 

मौलीने देखील तिच्या इन्स्टाग्रामवर लग्नाचे दोन फोटो शेअर केले आहेत. 

राजच्या लग्नाची बातमी कळल्यानंतर त्याच्या चाहत्यांनी त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.  .

बातम्या आणखी आहेत...