आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हा अभिनेता फळ विक्रेत्‍याकडून खरेदी करत होता पेरू, भाव ऐकुन झाला चकित

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'एक हजारों में मेरी बहना है' या प्रसिद्ध टीव्‍ही मालिकेत काम केलेले अभिनेते करन टॅकर यांचा एक व्हिडीओ सध्‍या सोशल मिडीयावर व्‍हायरल होत आहे. या व्हिडीओमध्‍ये करण रस्‍त्‍याच्‍याकडेला एका फळविक्रेत्‍याकडून पेरू खरेदी करतांना दिसत आहे. दरम्‍यान फळविक्रेत्‍याला पेरूचा भाव विचारला असता 150 रू प्रतिकिलो असल्‍याचे फळविक्रेता सांगतो. करण पेरूचे दर ऐकून अवाक् होत, 70 रूपयाचे पेरू खरेदी करतो. 70 रूपयात फक्‍त दोन पेरू भेटल्‍याने करण टॅकर आश्‍चर्यचकित होतो. 
 
कोण आहे करण टैकर ...?

मुळचे पंजाबचे असलेले करण टॅकर मु्ंबईत वाढले आहेत. टीव्‍ही इंडस्‍ट्रीमध्‍ये येण्‍याअगोदर त्‍यांनी बिझनेस मॅनेजमेंट मध्‍ये पदवी प्राप्‍त केली आहे. सर्वप्रथम 2008 साली प्र‍दर्शित झालेल्‍या 'रब ने बना दी जोडी' या चित्रपटामध्‍ये छोट्याशा भूमिकेत दिसले होते. त्‍यानंतर याच चित्रपटाच्‍या नावाशी मिळत्‍याजुळत्‍या 'लव ने बना दी जोडी' या सिरीयल मध्‍ये काम केले आहे. एका मुलाखती दरम्‍यान त्‍यांनी सांगितले की त्‍यांना सुगंध खूप आवडतो. मोगरा, जॅसमीन, झेंडू आदी फुलांचा सुगंध घेण्‍यास त्‍यांना आवडते. याशिवाय ते खाण्‍याचेही शौकिन आहेत. अमृतसर, दिल्‍लीसह कुठेही गेले तरी तेथील प्रसिद्ध खाद्यपदार्थांची चव चाखायला त्‍यांना आवडते. सोबतच गरमागरम गुलाबजाम त्‍यांचा आवडीचा खाद्यपदार्थ आहे.     

 

 

 

बातम्या आणखी आहेत...