Home | Gossip | tv actor mohammad iqbal khan celebrated his 38th birthday

कश्मीरहून हीरो बनण्यासाठी आला होता हा अभिनेता पण झाला फ्लॉप, चित्रपट चालले नाहीत तर काम मिळणेही झाले बंद, मग एका टीव्ही सीरियलमुळे एका रात्रीतून झाला स्टार 

दिव्य मराठी वेब टीम | Update - Feb 11, 2019, 12:21 PM IST

विवाहित असूनदेखील एका अभिनेत्रीसोबत जोडले गेले होते नाव... 

 • tv actor mohammad iqbal khan celebrated his 38th birthday

  मुंबई - 'कही तो होगा', 'काव्यांजली', 'वारिस', 'दिल से दिल तक', 'एक था राजा एक थी रानी', 'खतरो के खिलाडी' अशा टिव्ही शोजमध्ये काम करणारा अभिनेता मोहोम्मद इकबाल खान 38 वर्षांचा झाला आहे. इकबालने अभिनेत्री स्नेहा छाबडा हीच्यासोबत लग्न केले आहे. स्नेहा आणि इकबाल यांची भेट एका व्हिडीओ अल्बमच्या शूटिंगदरम्यान झाली. एकदा असेही झाले होते की, विवाहित इकबालचे नाव त्याची को-अॅक्ट्रेस जॅस्मिन भसीनसोबतही जोडले गेले होते. मात्र नंतर दोघांनीही हे स्पष्टपणे नाकारले आणि त्यांच्यामध्ये फक्त निखळ मैत्री असल्याचे सांगितले.

  फ्लॉप होते इकबालचे फिल्मी करियर....
  - कश्मीरचा असलेला इकबाल बॉलिवूडमध्ये करियर करण्याची ईच्छा घेऊन मुंबईमध्ये आला होता. खूप स्ट्रगस केल्यानंतर त्याला 'कुछ दिलने कहा', 'Fun2shh... Dudes in the 10th century', बुलेट - एक धमाका असे तीन चित्रपट मिळाले.
  - इकबाल खानचे हे तीनही चित्रपट फ्लॉप झाले आणि तो बॉलिवूडमध्ये स्वतःला सिद्ध करण्यास असमर्थ ठरला आणि त्यामुळे त्याला बॉलिवूडमध्ये काम मिळणेही बंद झाले. रिकामे बसण्यापेक्षा मग त्याने टिव्हीकडे जाण्याचे ठरवले.
  - इकबालने 2005 मध्ये 'कैसा ये प्यार है' ने टीव्हीमध्ये एंट्री केली. त्याची ही सीरियल खूप लोकप्रिय झाली आणि तो एका रात्रीत स्टार बनला. त्यानंतर त्याने सलग 19 सीरियल्समध्ये काम केले. त्याने यापूर्वी 2018 मध्ये आलेली सीरियल 'जज्बात'मध्ये काम केले होते. मात्र त्यानंतर तो कोणत्याही मालिकेत दिसला नाही.

Trending