आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

TV अॅक्टरने लग्नाच्या दिवशी पत्नीला गिफ्ट केली 2.65 कोटींची BMW,कारमधून वरात पोहोचली मंडपात

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबईः 'बिग बॉस-9' चा विजेता प्रिन्स नरुला आणि अभिनेत्री युविका चौधरी शुक्रवारी लग्नाच्या बेडीत अडकले. मुंबईत पंजाबी पद्धतीने हे दोघे विवाहबद्ध झाले. त्यांच्या लग्नाचे फोटोज आणि व्हिडिओज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. एका व्हिडिओत प्रिन्स BMW ने वरात घेऊन मंडपात पोहोचतो आणि सर्वप्रथम युविकाची भेट घेत असल्याचे बघायला मिळते. प्रिन्सने ही लग्झरिअस BMW कार युविकाला लग्नाच्या दिवशी गिफ्ट केली आहे. लग्नातील प्रिन्सने युविकाला दिलेली ही पहिली भेटवस्तू आहे. कारचे मॉडेल BMW i8 असून त्याची किंमत 2.65 कोटी रुपये आहे.

 

सासूबाईंचे अश्रू पुसताना दिसला प्रिन्स...
- प्रिन्स आणि युविका यांनी लग्नात धमाल डान्स केला. तर पाठवणीच्या वेळी युविकाचे कुटुंबीय इमोशनल झालेले दिसले.
- युविकाची आई तिची पाठवणी करताना अतिशय भावूक झाली होती. यावेळी प्रिन्स आपल्या सासूबाईंचे अश्रू पुसताना दिसला.
- या कपलच्या लग्नात सुनील शेट्टी, तब्बू, क्रिकेटर इरफान पठान, सोहेल खान, नेहा धूपिया, गुरमीत चौधरी, देबीना बनर्जी, प्रियांक शर्मा, बेनाफशा सूनावाला, 'रोडीज' फेम रणविजय सिंहसह अनेक सेलेब्स सहभागी झाले होते. 


21 ऑक्टोबर रोजी रिसेप्शन...
- प्रिन्स आणि युविका यांचे वेडिंग रिसेप्शन 21 ऑक्टोबर रोजी चंदीगड येथे होणार आहे. बुधवारी मुंबईत युविकाची मेंदी सेरेमनी आणि त्यांचा साखरपुडा झाला होता. त्यानंतर गुरुवारी संगीत सेरेमनी आणि कॉकटेल पार्टी झाली होती.
- मुंबईत झालेल्या या सर्व फंक्शन्समध्ये रणविजय सिंह, प्रियांक शर्मा, रश्मि देसाई, मोनिका बेदी, गर्लफ्रेंड अनुषा डांडेकरसह करण कुंद्रा सहभागी झाला होता. 
- संगीत सेरेमनीत प्रिन्सने युविकाला उचलून डान्स केला. तर युविकानेही तिच्या सासूसास-यांसोबत ताल धरला होता. 

बातम्या आणखी आहेत...