आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

15 वर्षांच्या टेलिव्हिजन करिअरबाबत शरद मल्होत्रा म्हणाला, ‘टीव्हीवर खूप काम केले आता वेब एक्सप्लोर बनण्याची इच्छा आहे’

एका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

किरण जैन, मुंबई : अभिनेता शरद मल्होत्राने अभिनयाला 2006 मध्ये सुरुवात केली होती. त्याने ‘बनू मैं तेरी दुल्हन‘ या टीव्ही मालिकेतून पदार्पण केले. तेव्हापासून आतापर्यंत त्याने बऱ्याच कौटुंबिक आणि ऐतिहासिक मालिकांमध्ये काम केले आहे. त्याला आता डिजिटल जगामध्ये काम करायचे आहे. 

शरद म्हणतो, ‘मला खरंच वेब प्लेटफॉर्मवर काम करायचे आहे. काही महिन्यांपासून मला टीव्ही मालिकांसाठी फोन येत आहेत, परंतु मी आता फक्त वेब शोजकडेच लक्ष देणार आहे. माझा हा निर्णय खूप कठीण आहे.’ 


शरदची शार्ट फिल्म ‘कश्मकश‘ लवकरच वेबवर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची कथा काल्पनिक आहे. जी प्रेक्षकांसमोर काही वास्तविक पात्र दाखवणार आहे. याबाबत सांगताना शरद म्हणाला, ‘वेब असे आहे जेे सर्वांनाच हवे आहे आणि आम्ही टीव्हीवर खूप काम करतो. वेबमुळे आपण तरुणांशी जोडले जात आहोत. लोकांना नेटवर मालिकांमधून नवीन काय पाहायला मिळेल याचे आकर्षण आहे. प्रेक्षकांना जाणून घ्यावयाचे असते की, या मालिाकांच्या पुढच्या भागात काय होणार आहे. तेच नव्हे तर मीदेखील उत्सुक असतो की, पुढच्या भागाात काय होणार आहे. वेब तुम्हाला खऱ्या जगापासून खूप लांब घेऊन जातो. जे जग खूप सुंदर आहे. त्यामुळे तुम्ही याकडे आकर्षित होता आणि जोडले जाता. आणि तुम्ही देखील त्या कथेमध्ये रमता. हाच अनुभव मला घ्यायचा आहे.' 

वेब आणि टीव्हीची तुलना करताना शरद म्हणाला, ‘टेलिव्हिजन एक वेगळे माध्यम आहे. याच्या कथा वेगळ्या असतात आणि त्याला मर्यादाही आहेत, परंतु वेबला कोणतीच मर्यादा नाही. याला कोणत्याही प्रकारचे सेन्सॉर नाही. मी ज्यात काम करतोय त्यामध्ये मी खूप विचित्र आणि देशी आहे. मी प्रथमच पडद्यावर द्विअर्थी शब्दांचा वापर केला आहे. अगदी बिनधास्तपणे पडद्यावर असे शब्द वापरण्याची मजा काही औरच आहे.'
 

बातम्या आणखी आहेत...