आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता वरुण बडोला म्हणाला, 'पालकांवर ओझे बनायचे नव्हते, म्हणून पैसा कमावण्यासाठी कारपेट्सची विक्रीही केली'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : बॉलीवूडचा किंग खान शाहरुख खान असो, गली बाॅय रणवीर सिंह असो किंवा मग आकर्षक कार्तिक आर्यन; सर्वांच्या संघर्षांच्या स्वतंत्र कथा आहेत. अशीच एक कथा टीव्हीवर समोर आली. टीव्ही स्टार वरुण बडोलाने आपल्या संघर्षाच्या काळातील बरेच अनुभव प्रेक्षकांना सांगितले. वरुण बडोला सध्या मेरे डॅड की दुल्हन' मालिकेत एका चिडचिड्या वडिलांचे पात्र साकारत आहे. त्याचे आयुष्य आपली मुलगी नियावर (अंजली तत्रारी) केंद्रित असते.

वरुण म्हणतो, मला आपल्या संघर्षाच्या दिवसांचा मोठेपणा सांगायला चांगले वाटत नाही. कारण एका कलाकाराचा संघर्ष कधीच संपत नाही. खूप कमी वयात मी आपल्या कम्फर्ट झोनमधून बाहेर आलो होतो आणि काम करायला सुरुवात केली होता. कारण पैशांसाठी मला आपल्या आई-वडिलांवर ओझे व्हायचे नव्हते. पैसा कमावण्यासाठी मी उन्हाळ्याच्या सुट्यांमध्ये नोकरी करत कारपेट्सची विक्रीही केली होती. यानंतर आणखी काही अनुभव घेण्यासाठी मी एका कॉस्टयूम डिझायनरचा सहायक झालो होतो.'

वरुणला दिग्दर्शन आणि लेखन क्षेत्राचाही अनुभव आहे. तो म्हणतो, मी 'दिल से' नावाची एक मालिका लिहिली होती, तो माझ्या आयुष्याचा टर्निंग पॉइंट होता. मी थोडा नाराज होतो आणि आपल्या कामावर अधिक विश्वासदेखील नव्हता. तथापि, निर्मात्यांनी मला आणखी लिहिण्यासाठी प्रेरित केले आणि माझ्या गुणवत्तेवर विश्वास ठेवला.'

सहायक दिग्दर्शकानंतर अभिनेता झालेला वरुण आणि तिग्मांशु धूलिया हे जवळचे नातलग आहेत. यामुळेच त्याला त्याची पहिली टीव्ही मालिका बनेगी अपनी बात' मिळाली. यानंतर त्याने कोशिश'मध्ये एका दिव्यांग व्यक्तीचे पात्र साकारले होते. नंतर अस्तित्व'मध्ये आपल्यापेक्षा १० वर्षे मोठ्या असलेल्या महिलेवर प्रेम करणाऱ्या व्यक्तीचे पात्र साकारले. सध्या मेरे डॅड की दुल्हन'मध्ये तो श्वेता तिवारीसोबत काम करत आहे.

बातम्या आणखी आहेत...