आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री अक्षिता मुदगल म्हणाली, 'आईची भूमिका साकारणे भावनिक आव्हान होते..'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : आईची जबाबदारी कशी पार पाडावी, हे शिकवावे लागत नाही, तुम्ही आपसूकच मातृत्वामध्ये तल्लीन होऊन जाता, असे म्हटले जाते. अक्षिता मुदगल ऊर्फ गायत्रीच्या बाबतीत देखील असेच घडले. जी सध्या कौटुंबिक मालिका 'भाखरवडी'मध्ये आईची भूमिका साकारत आहे. अभिजित (गौतम रोडे) आणि त्याचा मुलगा कृष्णा (विहान लोढा) आल्यापासून गायत्री मातृत्वामध्ये दंग झाली आहे. कृष्णा गायत्रीला त्याची आई समजतो. याबाबत गायत्रीला सुरुवातीला धक्का बसतो, पण शेवटी या लहान मुलाचे प्रेम पाहून तिच्या मनात त्याच्याबद्दल ओढ निर्माण होते. तरुण वयात आईची भूमिका साकारताना येणाऱ्या आव्हानाबाबत विचारले असता अक्षिता म्हणाली, 'पडद्यावर आईची भूमिका साकारणे माझ्यासाठी भावनिक आव्हान होते.' पडद्यावर आईची भूमिका साकारण्याच्या अनुभवाबाबत बोलताना अक्षिता म्हणाली, 'गायत्री चांगल्या स्वभावाची आहे. ती कृष्णाशी खूपच रुळली आहे. अक्षिता म्हणून मला आईची भूमिका साकारणे खूप अवघड होते. पण पूर्वी सांगितल्याप्रमाणेच मी गायत्रीच्या भूमिकेमध्ये सामावून गेले. ती पुढे म्हणाली, 'मला एक सीन आठवतो, ज्यामध्ये कृष्णा माझ्या मांडीवर झोपला आहे आणि मला घट्ट धरून आहे. झोपेमध्येच तो गायत्रीला विचारतो 'आप मेरी माँ हो ना?' गायत्री जड अंत:करणासह 'हो' म्हणणार होती. दिग्दर्शकांनी मला या सीनचे वर्णन केले आणि तो स्वत:चा मुलगा असल्याप्रमाणे विचार करून संवाद म्हणण्यास सांगितले. मी त्वरित भावनिक होऊन रडले. मी हा सीन पाहिला तेव्हादेखील खूप भावनिक झाले आणि माझ्या डोळ्यांमध्ये अश्रू आले. म्‍हणून माझ्यामध्ये मातृत्वाची भावना आहे, असे मला वाटते. माझ्या मते प्रत्येक मुलीमध्‍ये ती भावना असते. अक्षिता पुढे म्हणाली, 'आपल्या घरामध्ये आपण आईला काळजी घेताना, आपल्यावर प्रेमाचा वर्षाव करताना पाहतो. आई आपल्यासाठी अनेक लहानसहान गोष्टी करते. आपण रात्री कामावरून उशिरा आलो तर ती सकाळी लवकर उठून आपल्याला वेळेवर उठवते. 'आई' या शब्दामध्ये प्रेम, ओढ, राग व संगोपन अशा विविध भावना आहेत.
 

बातम्या आणखी आहेत...