आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर म्हणाली, 'मिनीच्या पात्राने माझा जीवनाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलून टाकला'

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

एंटरटेन्मेंट डेस्क : 'पटियाला बेब्स' या मालिकेचे निर्माते या मालिकेवर जास्तच मेहनत घेत आहेत. ही मालिका मायलेकीच्या नात्यावर आधारित होती. आता मालिकेने वेगळेच वळण घेतले आहे. या मालिकेत ५ वर्षांचे लीप घेण्यात आले आहे, त्यानंतर हुनमान आणि बबिता यांचा दुर्घटनेत मृत्य झाल्याचे दाखवण्यात आले. त्यांतनर विदेशात जाऊन फोटोग्राफीचे करियर करण्याचेे नाही तर सर्व काही सोडून आपला रेस्टारेंट सांभाळायचा निर्णय मिनीला घ्यायचा होता, याबरेाबरच आर्याला सांभाळणेदेखील महत्त्वाचे होते. या मालिकेत मुख्य भूमिका साकारणाऱ्या अशनूर काैरसाठी ही मालिका खूपच खास आहे. या विषयी ती म्हणते, जीवनात अनपेक्षित वळण कसे येतात, शिवाय कितीही वाईट परिस्थिती आली तरी डगमगायचे नाही, मी हे मालिकेतून शिकले. लीपनंतरच्या कथेने मनावर आणि मेंदूवर बराच परिणाम झाला. नुकत्याच झालेल्या एका मुलाखतीत अशनूरने सांगितले,या मालिकेमुळे माझा जीवनाला बघण्याचा दृष्टिकोन बदलला. याच्या कथेमुळे मला कळाले की, जीवनात अनेक चढ-उतार येत असतात.

जीवनात काहीही हाेऊ शकते, यातून कळाले. या मालिकेत माझ्या पात्राला आई-वडिलांचा घटस्फोट पाहावा लागला, आईला तिची ओळख निर्माण करण्यात तिची मदत करणे, तिचा पुनर्विवाह करून देणे, त्यानंतर आई-वडिलांचा मृत्यू पाहणे सर्व काही पाहावे लागले.

कलाकार म्हणून आम्ही फक्त पात्र साकारत असताे. शूटिंग संपताच आपल्या पात्रातून बाहेर येण्याचा प्रयत्न करतो. मात्र कथा इतकी दमदार आहे, की पॅकअपनंतरही मनात तेच विचार येत असतात. मिनीच्या पात्राने जीवनाला बघण्याचा माझा दृष्टिकोन बदलून टाकला. आता मी आपल्या व्यावसायिक आणि वैयक्तिक आयुष्यात संतुलन बनवण्याचा प्रयत्न करतेय. मित्र आणि कुटुंंबाला जास्तीत जास्त वेळ देण्याचा प्रयत्न करते.

बातम्या आणखी आहेत...