आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

टीव्हीच्या छोट्या बालिका वधूने केला 'लँबॉर्गिनी' डान्स, प्रसिध्द पंजाबी गाण्यांवर दाखवले शानदार मूव्ह तर कोरियोग्राफरही पडला फिका, आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिला व्हिडिओ

2 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई. छोट्या पडद्यावरील बालिका वधू म्हणजे अविका गौर सध्या आपल्या डान्स व्हिडिओमुळे खुप चर्चेत आहे. व्हिडिओमध्ये अविका प्रसिध्द पंजाबी गाणे लँबॉर्गिनीवर जबरदस्त डान्स परफॉर्मेंस देताना दिसतेय. बालिका वधूचे पात्र साकारुन तिने चाहत्यांच्या मनात विशेष स्थान निर्माण केले. पण या व्हिडिओमध्ये ती खुप ग्लॅमरस अंदाजात आपल्या किलर मूव्ह दाखवतेय. या गाण्यात ती एका शिमरी शॉर्ट कॉकटेल ड्रेसमध्ये डान्स करतेय. तिच्यासोबत तिचा कोरियोग्राफर आदिल खानही डान्स करताना दिसतोय. अविकाच्या या व्हिडिओला आतापर्यंत 9 लाखांपेक्षा जास्त लोकांनी पाहिले आहे. अविका गौरच्या वर्कफ्रंट विषयी बोलायचे झाले तर ती सध्या खतरों के खिलाडी या रिअॅलिटी शोमध्ये दिसतेय. 'ससुराल सिमर का'मध्ये प्रमुख भूमिका साकारलेली अविका गौर(21) आपला ऑनस्क्रीन पार्टनर मनीष रायसिंघानी (39)सोबतच्या लिंकअपच्या वृत्तांमुळेही चर्चेत आली होती. दोघांच्या वयाच जवळपास 18 वर्षांचे अंतर असूनही ते एकमेकांना डेट करत असल्याचे वृत्त होते. पण या जोडीने कधीच आपले रिलेशनशिप स्विकारले नाही. 


 

बातम्या आणखी आहेत...