आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘क्वीन जॅस्मीन पात्राच्या प्रभावाने मी घरीदेखील तशीच वागत होते’

3 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

अभिनेत्री अवनीत कौर सध्या ‘अलादीन-नाम तो सुना होगा’ मालिकेत क्वीन जॅस्मीनचे पात्र साकारत आहे. रविवारी तिने आपला १८ वा वाढदिवस साजरा केला. याचबरोबर ती प्रौढ झाली आहे. या मुलाखतीत तिचा बर्थडे आणि नव्या मालिकेबाबत चर्चा...

- वाढदिवस साजरा केल्यानंतर तू प्रौढ झालीस. विशेष जबाबदारीची जाणीव होत आहे का?
नक्कीच, जबाबदारीची जाणीव मला खूप आधीपासूनच आहे. कारण घरामध्ये मी मोठी आहे. माझ्यापेक्षा लहान भाऊ आहे. आता मी मत देण्यासाठीही तयार आहे. मतदार कार्ड बनवण्यासोबतच आधार कार्डही बदलून घ्यायचे आहे. ककारण १८ वर्षांची होण्यासोबतच आता मोठीदेखील झाले आहे. प्रौढ झाल्यानंतर खूप बदल होतात. 

- या वेळी आपला वाढदिवस कसा साजरा केला?
अगदी साध्या पद्धतीने. तीन-चार दिवसांची सुटी मिळाली की फिरायला जाऊ, असा विचार करत होते. मात्र, व्यग्र शेड्यूलमुळे दिवसा ‘अलादीन’ची शूटिंग केली. सायंकाळी मित्र, कुटुंबीय आणि अभिनेते मित्रांसोबत बर्थडे सेलिब्रेट केला. माझा सहकलाकार सिद्धार्थ निगमने तर सेटवर दोन दिवसांपूर्वीच मला वाढदिवसाची सरप्राइज दिली होती. सेटवरच तो केक घेऊन आला तेव्हाच मला सरप्राइज बर्थडेबाबत कळाले. 

- राजकुमारीच्या गेटअपमध्ये कसे वाटते?
मला नॉर्मल राहायचे आहे, परंतु कास्टिंग ज्वेलरी घालून राजकुमारीच्या गेटअपमध्ये येते तेव्हा विचारही बदलतात. ही बाब माझ्या आई-वडिलांनीही अनुभवली आहे. एकदा माझ्या आईने तू, खरीखुरी राजकुमारी नाही, असे वागू नको म्हणत रागावलेदेखील होते. सुरुवातीला माझे या पात्रातून बाहेर येणे कठिण झाले होते. मी घरी राजकुमारीप्रमाणे चालत-फिरत होते, तशीच वागतही होते. मात्र, आता सर्वकाही ठीक झाले आहे. 

- ‘अलादीन’ सारखी मालिका करण्याचे खास कारण?
असे काहीही नाही. मला जे चांगले वाटते ते मी करते. ‘चंद्र नंदिनी’मध्ये माझी जास्त मोठी भूमिका नव्हती. ‘अलादीन’मध्ये तर भले मोठे पात्र आहे. त्यामुळे या मालिकेसाठी नकार देऊ शकले नाही. 

- प्रौढ झाल्यानंतर कामकाजाच्या पद्धतीत कशा प्रकारे बदल करणार आहेस?
माझ्या कामात काही बदल होईल, असे मला वाटत नाही. मी जे करत आले आहे, तेच यापुढेही करत राहील. बदल वगैरे करणार नाही. बोल्ड पात्र करण्याबाबत अद्याप विचार केलेला नाही. 

- शिक्षण आणि अभिनय दोन्हींमध्ये कसा समन्वय ठेवतेस?
मी १० वर्षांची असतानापासून शिक्षण आणि अभिनय दोन्ही करत आले आहे. आता या गोष्टींची सवय झाली आहे. सध्याही माझे हेच रूटीन फॉलो आहे. सध्या मी बारावीत शिकत आहे. 

- अभिनय क्षेत्रातील कामामुळे लहानपण हिरावून घेतले, असे तुला वाटत नाही का? 
मला असे कधीच वाटले नाही. कारण पालकांची साथ पदोपदी मिळत राहिली. एकदा आम्ही सिनेमा पाहायला जात होतो तेव्हा माझे पालक म्हणाले, जा आपल्या मित्रांसोबत फिरायला जा. माझ्या पालकांनी कधी वेळ दिला नाही, असे कधी वाटलेच नाही. माझे पालक खूप चांगले आहेत. 

बातम्या आणखी आहेत...