आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराभक्ती राठोड सध्या 'भाकरवाडी' मध्ये ताऊच्या गेटअपमध्ये दिसत आहे. नुकतेच तिने दिव्य मराठीसोबत या शो आणि तिच्या नवीन गेटअपविषयी चर्चा केली. जाणून घेऊया काय म्हणाली...,
ताऊच्या भूमिकेसाठी तू पुरुषाचा वेश धारण केला आहे, याविषयी काही संाग ?
सध्या कथेत बरेच वळण सुरू आहेत. त्यात उर्मिला अभिषेक आणि गायत्री पुन्हा एकत्र येण्याच्या मिशनवर आहेत. यासाठी उर्मिला अनेक कल्पना घेऊन येते. ट्रॅक जसजसा पुढे सरकतो तसतसे उर्मिलाची कल्पना ओसरते. या परिस्थितीतून बाहेर पडण्यासाठी आणि अण्णांचा निर्णय बदलण्यासाठी उर्मिला आणि इतर सर्वांनी अण्णांचा भाऊ आणण्याची योजना आखली. ताऊ ही एकमेव अशी व्यक्ती आहे, जी अण्णांना समजावून सांगू शकेल. प्रत्येकजण ताऊला येथे कसे आणायचे किंवा त्याला काय झाले असावे आणि तो जिवंत आहे की नाही याबद्दल विचार करत आहे. अशा परिस्थितीत उर्मिलाने स्वत:ही परिस्थिती हातात घेण्याचे ठरवले आणि तिने स्वतः ताऊचे रूप धारण केले.
पुरुषाच्या गेटअपमध्ये राहणे अवघड असते की सोपे ?
खरंतर, भूमिकेवर या सर्व गोष्टी अवंबलून असतात. महिलांसाठी पुरुषाच्या गेटमध्ये येणे खूपच अवघड आहे. शरीर लपवू शकत नाही. शिवाय महिला आणि पुुरुषांच्या उंचीतही खूप फरक असतो. त्यामुळे महिलांसाठी पुरुषांच्या गेटअपमध्ये येणे खूपच अवघड असते. ताऊच्या भूमिकेसाेबतच वास्तविक दाखवणे आणखीनच अवघड आहे.
ताऊच्या लूकसाठी किती वेळ लागयचा ?
टीममधील सर्व लोकांनी आपापली मते जाणून घेतली आणि आम्ही दोन दिवस सतत त्यावर काम केले. एके दिवशी मी ११ तास ३० मिनिटे सतत काम केले. आम्ही ७० ते ८० मध्ये लोक कसे राहायचे त्याचा अभ्यास कला. त्याअनुरुप तो लूक बनवण्याचा प्रयत्न केला. शिवाय निर्मिते, टीम आणि चॅनेलने लूकसाठी बरेच परिश्रम घेतले. दुसरे आव्हान वय होते. वृद्ध दाखवण्यासाठी आम्हाला कृत्रिम मेक-अप करायचा नव्हता. शेवटी आम्ही बंडी घालण्याचा निर्णय घेतला आणि टेलरने लगेच कपडे िशवून दिले. त्यानंतर मी उर्मिलाच्या मेकअपनंतर ताऊच्या लूकमध्ये आले.
तू मराठी शिकण्यासाठी काय -काय केले ?
मी सुरुवातीपासूनच कोणतीही भाषा शिकण्यास उत्सुक आहे. मी महाराष्ट्रात राहते त्यामुळे मराठीत यायला हवी, असे मी मानते. तसेच मला प्रवास करण्याची आवडदेखील आहे आणि बऱ्याच ठिकाणी गेले आहे, म्हणून मला ही भाषा समजते. शिवाय मी एका महाराष्ट्रीयनशी लग्न केले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.